शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हरित वनांच्या निर्मितीसाठी सीड लड्डू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 00:52 IST

महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली.

नाशिक : महिला पाककलेत निपुण असतात. कधी दिवाळीनिमित्त, तर कधी विविध समारंभासाठी त्या लाडू बनवीत असतात; पण हरित वनांच्या निर्मितीसाठी एक आगळावेगळा उपक्र म साजरा करत झाडांच्या बियांचे म्हणेज सीड लड्डू तयार करण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली.  कम्युनिटी हेल्थ फाउंडेशन व वॉव ग्रुप (वुमन आॅफ विजडम) यांच्या संयुक्त विद्यमाने सीड लड्डू कार्यशाळा त्र्यंबकरोडवरील देना लक्ष्मी कॉलनी येथील समाजमंदिरात आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांतर्गत माती आणि शेणाच्या मिश्रणात एखादी ‘बी’ घालून त्यातून ‘सीड लड्डू ’ म्हणजेच चिखलाचे गोल लाडू तयार करण्यात आले. या उपक्रमात सहभागी होऊन अनेक महिला, लहान मुलांनी पाच हजार सीड लड्डूची निर्मिती केली. यासाठी बियाणे निवडताना देशी वाण तसेच ज्या झाडांना जनावरे खात नाहीत व उगवण क्षमता जास्तीत जास्त असलेल्या करंज, शिवण व पळस अशा बियांची लागवड सीड लड्डू बनविण्याकरिता करण्यात आली.  या उपक्रमात वॉव ग्रुपच्या अध्यक्ष रेखा देवरे, कम्युनिटी हेल्थ फाउंडेशनच्या अश्विनी न्याहारकर, सुरेखा बोडके, यशश्री पवार, वृषाली पाटील, भारती वाघ, सरोज महाजन, शीतल साळी, सीमा पाटील, चंचल पवार, वैशाली मराठे, अर्चना बोथरा, वंदना लोहाडे, अंजू गंगावणे, प्राची पाटील सहभागी झाले होते. ज्या व्यक्तींना सीड लड्डूच्या माध्यमातून वृक्षारोपण करायचे असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.  या उपक्र माबाबत माहिती देताना अश्विनी न्याहारकर यांनी हे सीड लड्डू विविध संस्था, कार्यालये, ट्रेकर्स ग्रुप यांसारख्या घटकांना भेट देण्यात येणार आहेत, जेणेकरून हे सीड लड्डू पावसाळ्यात विविध ठिकाणी टाकले जातील, असे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

टॅग्स :forestजंगल