शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

राज ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची बघा महापूरात अशी झाली अवस्था...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 15:16 IST

भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे.

ठळक मुद्देतरूण-तरूणींनी आपली कला याच पार्कमध्ये सादर केली मनपाकडून अद्याप स्वच्छताही नाही

नाशिक : महापालिकेत मागील पंचवार्षिकमध्ये सत्ता असताना राज ठाकरे यांनी खासगी विकासकामार्फत गोदाकाठालगत आगळावेगळा असा ‘गोदापार्क’चा प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पावर लाखो रूपये खर्च करण्यात आले. त्यानंतर गोदापार्क नाशिककर तरूणाईचे आवडते ठिकाण बनले; मात्र २०१६नंतर पुन्हा यावर्षी रविवारी (दि.४) आलेल्या गोदावरीच्या महापूराचा जोरदार तडाखा या प्रकल्पाला बसला. त्यामुळे पुन्हा राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील ‘गोदापार्क’ उभारण्यासाठी प्रयत्न करणार का? अशी चर्चा नाशिककरांमध्ये होऊ लागली आहे.

सत्ताकाळात मनसेने नागरी विकासकामांतर्गत काही प्रकल्प शहरात उभारले. त्यामध्ये गोदापार्कचाही समावेश होतो. बापू पूलापासून पुढे हा प्रकल्प आकारास आला. रम्य गोदाकाठी सकाळ-सायंकाळ नाशिककरांना फेरफटका मारता यावा तसेच अल्हाददायक वातावरणात सहकुटुंब एकत्र येऊन गप्पागोष्टी करता याव्यात हा यामागील उद्देश होता; मात्र या गोदापार्कचे अप्रुप अन् कुतुहल अबालवृध्दांना आहे, तितकेच तरूणाईलादेखील राहिले आहे. दरम्यान,च्या काळात ‘प्रेमवीर’पार्क म्हणूनदेखील या प्रकल्पाविषयी बोलले जाऊ लागले. तसेच ‘मिस्तुरा’सारखे कलाप्रदर्शनदेखील मागील दोन वर्षांपासून याच ठिकाणी पार पडले आणि विविध कला महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या तरूण-तरूणींनी आपली कला याच पार्कमध्ये सादर केली आहे; मात्र आता महापूराच्या तडाख्यात नाशिककरांचा हा गोदापार्क वाहून गेला, असे म्हटले तरी वावगे होणार नाही.

मनपाकडून अद्याप स्वच्छताही नाहीगोदापार्क पुन्हा नव्याने आकारास येईल की नाही, याविषयी शंका आहे; कारण भाजपाची सत्ता असलेल्या महापालिका प्रशासनाने याठिकाणी अद्याप स्वच्छतादेखील करणे पसंत केलेले नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून गोदापार्क विकासासाठी प्रयत्न होने ही आशा ठेवणेही नाशिककरांसाठी मुर्खपणाचे ठरणारे आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यांच्या स्वप्नातील गोदापार्क पुन्हा झळाली देण्यासाठी काय पावले उचलतात त्याकडे सध्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेNashik Floodनाशिक पूरgodavariगोदावरीMNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना