शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बाजारपेठेला मंदीचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:18 IST

शेतमाल दरात घसरण : छोटे व्यावसायिकही संकटात

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठेची उलाढाल शेतीमालावर अवलंबून आहे.शेतीमालाचे दर तेजीत असतील तर बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी असते

पिंपळगाव बसवंत : आशिया खंडातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असा नावलौकीक मिळवणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरातील बाजारपेठेवरही शेतमाल दरात होणा-या घसरणीचा परिणाम दिसून येऊ लागला असून सद्यस्थितीत बाजारपेठेला मंदीचा वेढा पडल्याने छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.पिंपळगाव बसवंत येथील बाजारपेठेची उलाढाल शेतीमालावर अवलंबून आहे.शेतीमालाचे दर तेजीत असतील तर बाजारपेठेत खरेदीसाठी तोबा गर्दी असते.मात्र, टोमॅटो,कांदा यासह इतर शेतीमालाचे दर कोसळल्याने पिंपळगावतील बाजारपेठेला मंदीचा वेढा पडला आहे. कोटींची उलाढाली होणा-या पिंपळगाव शहरात व्यावसायिकांची बोहोनी होणे अवघड होऊन बसले आहे. पिंपळगाव बसवंतला कांद्यासाठी आशिया खंडातील नामवंत व शंभर एकरवर पसरलेली सगळ्यात मोठी बाजारसमिती असल्याने शहराला श्रीमंताची झालर आहे. येथील बाजारपेठ नेहमीच गजबजलेली असते. मात्र शेतीमालाच्या कोसळलेल्या दराने बाजारपेठेलाही ग्रहण लागल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतमालाचे सातत्याने दर कोसळत असल्याने व्यावसायिक महिनाभरापासून चिंतेत आहेत.कोट्यवधीची उलाढाल ठप्पसोने,दुचाकी,चारचाकी,कृषी केंद्र,बांधकाम उपयोगी साहित्य,कापड विक्र ी, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह इतर खरेदी विक्र ी करणारा मोठा व्यापारी व व्यवसायिक वर्ग दररोज कोटीची उलाढाल या ठिकाणी करत असतो. परंतु मंदीच्या जाळ्यात सर्वच व्यवसायिक अडकल्याने, होणारी उलाढाल निम्म्यापेक्षा जास्त घटल्याचे चित्र आहे. कांद्याचे सरासरी दर ३०० रु पये प्रति क्विंटल तर टमाट्याने शेतक-यांना हताश केले आहे. 

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार