शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘कश्यपी’ची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:26 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे.

ठळक मुद्देटवाळखोरांचा उपद्रव । मार्गदर्शक फलकाची नासधूस; कारवाईची मागणी

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम भागातील प्रमुख धरण असलेल्या कश्यपी धरण परिसर दिवसेंदिवस संवेदनशील होत असून, अतिउत्साही व मद्यपीच्या टोळ्यांच्या वावरामुळे परिसरात अनेक दुर्घटना कायम घडू लागल्या आहेत. धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव लावण्यात आलेले तसेच धरणाच्या पाणी क्षेत्रात जाण्यास प्रतिबंध करणारे मार्गदर्शक फलकाची टवाळखोरांनी नासधूस केली आहे. टवाळखोरांच्या या वाढत्या उपद्रवाकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले असून, त्यामुळे नसल्याने परिसरातील हॉटेलचालकांनी धरणाच्या परिसरात शिरकाव करण्यास सुरुवात केली आहे.नाशिक तालुक्यातील पश्चिम भागात बांधण्यात आलेल्या कश्यपी धरणावर कायमच शहरी पर्यटकांची गर्दी असते. डोंगरी भागात निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या कश्यपी धरणाच्या परिसरात अनेक हॉटेल्स आहेत. मांसाहार व ताजे मासे व हौशी पर्यटकांसाठी मिळतात, त्यामुळे निवांत रम्य परिसर म्हणून मौजेसाठी अनेकजण याठिकाणी येतात. मात्र या भागात उत्साही व टवाळखोरांचा मुक्तवावर असल्याने हा परिसर अतिशय धोकेदायक व संवेदनशील बनला आहे. धरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.पर्यटकांच्या जिवाची काळजी व धरणाची सुरक्षितता लक्षात घेता, धरण परिसरात धोकेदायक ठिकाणी प्रतिबंध करणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र टवाळखोरांकडून या फलकांची मोडतोड करण्यात आली आहे.या भागातील पर्यटकांची वाढती संख्या व सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांची कायमस्वरूपी गस्त असावी, अशी मागणी धोंडेगाव व कश्यपीनगरच्या नागरिकांनी केली आहे.दुर्घटनेची शक्यताधरणांचा परिसर कचरामुक्त असायला हवा, मात्र पर्यटकांकडून प्लॅस्टिकचा सर्रास वापर व दारूच्या बाटल्यांचा खच कायम आढळतो. सध्या धरणाला भरपूर पाणी असून, अनेक अतिउत्साही तरुण पाण्याचा अंदाज न बांधता उड्या घेतात त्यातून दुर्घटना घडल्या आहेत. तर महिला, तरुणींच्या छेडछाडीचे प्रकारही या ठिकाणी घडू लागल्याने या भागात आता एकटे दुकटे फिरणे धोकेदायक बनले आहेत.कश्यपी धरणावर येणाºया पर्यटकांचा प्रकल्पग्रस्तांना काही फायदा नाही. धरणासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळाला नाही. अशात या भागात वाढते पर्यटन व टवाळखोरांचा नेहमीच्या उच्छादामुळे धरणांचे फलकही असुरक्षित आहेत. त्यामुळे या भागात कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. यासंदर्भात आम्ही प्रशासनाला पत्रही दिले आहे.- सोमनाथ बेंडकोळी, धोंडेगाव

टॅग्स :Damधरण