शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात गुपचूप वृक्षतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा वृक्ष अनेकांना वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत असताना त्याची अडचण कोणाला व का झाली याविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा वृक्ष अनेकांना वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत असताना त्याची अडचण कोणाला व का झाली याविषयी अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.  विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रत्येक वृक्षाला संगोपनाच्या राख्या बांधण्यात प्रशासनच अग्रेसर होते.जिल्हाधिकारी कार्यालयातील या उद्यानात अनेक जुने झाडे असून, जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या परगावच्या अभ्यागतांसाठी हे झाडे वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत आहेत. असे असताना शनिवारी यातील गुलमोहर जातीच्या झाडाची वृक्षतोड करणाºया कर्मचाºयांच्या मदतीने कत्तल करण्यात आली. प्रस्तुत प्रतिनिधीने याठिकाणी भेट देऊन विचारपूस करण्यास सुरुवात करताच, झाड तोडणाºया कर्मचाºयांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे सदरचे झाड तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अनुमती घेतली होती किंवा नाही याविषयी प्रश्न निर्माण झाला आहे.  जर प्रशासनाच्या अनुमतीनेच झाडाची कत्तल केली असेल तर त्यासाठी शासकीय सुटीच्या दिवशी सदरचा प्रकार गुपचूप करण्याचे कारण काय? वृक्ष तोडीसाठी महापालिकेडे रितसर अर्ज केला होता काय, वृक्ष प्राधिकरण समितीने त्यास अनुमती देऊन झाड तोडीवर जनतेच्या हरकती मागविण्यात आल्या होत्या काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.एरव्ही पर्यावरणाचा -हास थांबविण्यासाठी कोट्यवधी वृक्ष लागवड केल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाºया प्रशासनानेच आपल्या आवारातील वृक्षांची कत्तल केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याबरोबरच वृक्षांप्रती असलेले बेगडी प्रेमही या निमित्ताने दिसून आले आहे. घरासमोरील वृक्षाचा अडथळा होत असल्यास नुसत्या फांद्या तोडल्या तरी नोटिसा व फौजदारी कारवाई करण्यास तत्पर असलेली नाशिक महापालिका व रस्त्याच्या मधोमध असलेल्या वृक्षांमुळे अपघात होत असतानाही वृक्षतोडीस विरोध करणारे वृक्षपे्रमी आता काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयforestजंगल