शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छुप्या पद्धतीचे गावठी दारूचे अड्डे उध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:55 IST

कळवण : ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले असून या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नांदुरी, भूसणी, ककाने, खेडगाव, भेंडी, विसापूर शिवारातील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उध्वस्त केला.

ठळक मुद्देकळवण : कळवण पोलीसांची दारु विरोधात धडक मोहीम ; विक्रेते भयभीत

कळवण : ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले असून या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नांदुरी, भूसणी, ककाने, खेडगाव, भेंडी, विसापूर शिवारातील गावठी दारु बनवणारा अड्डाच पोलिसांनी उध्वस्त केला.या धडक मोहीमेत गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहित्य साधनासह १६४ लिटर गावठी दारु , १५ लिटर देशी दारु, ४७० लिटर रसायन असा एकूण ४५ हजार रु पयांचा माल जप्त करण्यात आला आहे. तर गावठी दारु तयार करण्याचे साहित्य साधन जागेवर नष्ट करण्यात आले.गावठी दारु पुरवठा करणारे व बनविणारे यांच्या विरोधात धडक मोहीम सुरु करण्यात आल्याने अवैध दारु विक्र ी व गावठी दारु विक्र ेत्यांचे धाबे दणाणले आहेत.कळवणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अविनाश गडाख, पोलीस हवालदार मधुकर तारु, संदीप कडाळे, भोये, घोडे, ढुमसे, बोरसे, सचिन बावा, सुरेश पवार, खैरनार, घरटे, सुनील जाधव यांनी सदर कारवाई केली.सप्तशृंग गड, नांदूरी, शिरसमणी, नवीबेज परिसरातील अवैध दारु विक्रेते पोलिस यंत्रणेच्या रडारवर असून अवैधरित्या दारु विक्र ी करणाऱ्यांच्या विरोधात पालिसांनी मोहीम उघडली असल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.या माहिमेकरीता साध्या वेष्यात पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी खासगी वाहनाने धाड टाकत असल्याने दारू विक्र ेत्यांची दमछाक झाली आहे.