शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी कोरोनाचा दुसरा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 14:05 IST

मालेगाव : शहरात शनिवारी कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर ११ रुग्ण कोरोना बाधीत (पॉझीटीव्ह) आढळून आल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

मालेगाव : शहरात शनिवारी कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर ११ रुग्ण कोरोना बाधीत (पॉझीटीव्ह) आढळून आल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. शहर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. घराबाहेर रस्त्यावर व बाजारपेठांमध्ये पडून प्रशासनाला आव्हान देण्याचा प्रकार शहरात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलावीत अशी मागणी सामाजिककार्यकर्त्यांकडून केली जात आहे.गेल्या दोन दिवसांपासून मालेगाव उत्तर महाराष्टÑातील कोरोना आजाराचे हॉटस्पॉट ठरु पाहत आहे. शहरात गेल्या गुरूवारी पाच पॉझीटीव्ह रुग्ण आढळले होते तर एकाचा बळी गेला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेल्या अहवालात अजुन पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले होते. शनिवारी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २२ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर येथील महसुल, पोलीस, महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहराच्या पूर्व व पश्चिम बाजुला जोडणा-या पुलांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी शुक्रवारी रात्री संचारबंदीत वाढ केली आहे. शनिवार दि. ११ रोजी सकाळी ७ ते मंगळवार दि.१४ रोजी रात्री १२ पर्यंत शहर पूर्णपणे लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संचारबंदी काळात पेट्रोलपंप, दूध, मेडिकल, रुग्णालये व इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. संचारबंदी काळात नागरिकांनी माक्स वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.