सातपूर : मेटल फिनिशर्स असोसिएशनच्या सदस्यांचे सर्वेक्षण करून कायदेशीर पूर्तता नसलेल्या उद्योगांवर उद्योगबंदीची कारवाई केली असली तरी दुसऱ्या टप्प्यात अन्य प्लेटिंग अथवा रासायनिक उद्योगांचीदेखील चौकशी करून बेकायदेशीर उद्योगांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे मुख्य सचिव डॉ. पी. अनबनगल यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉ. अनबनगल यांनी निमात येऊन प्लेटिंग उद्योजकांशी सविस्तर चर्चा केली. ज्या प्लेटिंग उद्योगांवर मंडळाने उद्योगबंदीची कारवाई केली आहे त्यातील काही उद्योगांनी कायदेशीर बाबींची पूर्तता पूर्ण केली आहे. (वार्ताहर)
दुसऱ्या टप्प्यात बेकायदेशीर उद्योगांवर होणार गुन्हे दाखल
By admin | Updated: January 7, 2017 01:17 IST