शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आज भरणार दुसऱ्या टप्प्यातील अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:58 IST

नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे अकरावी प्रवेश सविस्तर वेळापत्रक जाहीर होणार

नाशिक : राज्यातील प्रमुख शहरांत अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, दहावीचा आॅनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रि येचा दुसरा टप्पा (भाग दोन) भरण्यासह अकरावीच्या जागांचे वाटप व प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी (दि.११) जाहीर होण्याची शक्यता आहे.दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन अर्जाचा भाग एक व भाग दोन भरणे अनिवार्य असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या नाहीत, त्यांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच यंदा विद्यार्थ्यांना एका विद्याशाखेसाठी दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविता येईल, तर त्या फेरीत प्रवेश न मिळाल्यास दुसºया फेरीसाठी विद्यार्थ्यांना विद्याशाखा बदलण्याची संधी असेल. तसेच महाविद्यालयांचा पसंतीक्रमही बदलता येऊ शकणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रवेशप्रक्रिया फायदेशीर असून, विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. नाशिक शहरात अकरावीच्या विज्ञान, वाणिज्य, कला व संयुक्त शाखा यांची ५७ कनिष्ठ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशाच्या २७ हजार ९० जागा उपलब्ध असून, या जागांवर प्रवेशासाठी आतापर्यंत २१ हजार ७२४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी भाग एक भरला आहे, त्यांना सोमवारी (दि.११) भाग दोन भरण्याचे वेळापत्रक नियोजन जाहीर झाल्यानंतर आपल्या आवडीच्या शाखेचा पर्याय, महाविद्यालयांचा पसंतीक्र म नोंदवावा लागणार आहे. त्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेशप्रक्रियेसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार असून, विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार प्रवेशप्र्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.१५ हजार अर्जांची पडताळणीशहरातील अकरावी प्रवेशासाठी पहिल्या भागात आतापर्यंत प्राप्त २१ हजार ७२४ विद्यार्थ्यांची नोंदणीप्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यातील १५ हजार ७३६ अर्जांची पडताळणी मुख्याध्यापकांकडून करण्यात आली आहे. आॅनलाइन अर्जाचा भाग-१ भरताना विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती सादर केली असून, विद्यार्थ्यांनी आपला यूजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून भाग दोन भरताना आवडीच्या विद्याशाखा व पसंतीक्र मानुसार किमान एक तर जास्तीत जास्त दहा महाविद्यालयांची निवड करण्याची संधी असेल. पहिल्या गुणवत्ता यादीनंतर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रि या राबविली जाणार असून, पहिल्या यादीनंतर विद्यार्थ्यांना दुसºया फेरीसाठी विद्याशाखा तसेच कॉलेजेसचा क्रमही बदलता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र