शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी आज दुसरी यादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 00:29 IST

नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

नाशिक : नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ते २५ जुलैदरम्यान प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. दुसऱ्या यादीचा कटआॅफ तीन ते चार टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे. दुसºया यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत प्रवेश घेणे अनिवार्य असेल.पहिल्या यादीत निवड झालेल्या १५ हजार विद्यार्र्थ्यांपैकी केवळ ८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला. त्यामुळे पहिल्या यादीनंतरचे सात हजार आणि उर्वरित दहा हजार अशा एकूण १७ हजारांहून अधिक विद्यार्थी दुसºया गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. पहिल्या यादीप्रमाणेच विज्ञान आणि वाणिज्य या दोन्ही शाखांसाठी शहरातील प्रमुख महाविद्यालयांतील कटआॅफ हा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर उर्वरित महाविद्यालयांत मात्र कटआॅफ खाली येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे लक्ष दुसºया यादीकडे लागले आहे. पहिल्या यादीत १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यातील केवळ ८ हजार १७१ विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.पहिली गुणवत्ता यादीत प्रथम पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या ९ हजार २२ विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य होते. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी मंगळवार (दि. १६) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत विहीत मुदतीत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रथम पसंतीक्रम मिळूनही एक हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे प्रवेश पुढील तीन नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित (ब्लॉक) करण्यात आले आहे. त्यांचा प्रवेश अर्जाचा क्रमांक व दहावीचा सीट क्रमांक ब्लॉक होतील.१५ हजार जागा उपलब्धनाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या २३ हजार ८६० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या यादीत कला शाखेतील २ हजार ५६३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ६२९, तर विज्ञान शाखेच्या ६ हजार ३९६ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, दुसºया ते दहाव्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम पसंतीच्या महाविद्यालयासाठी थांबण्याची भूमिका घेतली आहे, त्यांना दुसºया गुणवत्ता यादीची प्रतीक्षा लागलेली आहे. आता १५ हजार जागा उपलब्ध आहेत.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी