शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आत्मानंदासाठी धडपडणाऱ्या माणसांसाठी वारी हा एक शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 01:16 IST

सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात.

प्रा़ डॉ. कमल अहेर - कुवरसुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, टाळमृदंगाच्या गजरात शेकडो वारकरी पायी ही वारी करतात. त्यात वयाच्या ओझ्याने वाकलेला, काठी टेकत चालणारा भक्त असतो. तेलमीठ-पीठाचे ओझे डोक्यावर, कडेवर लहान मूल घेऊन चालणारी कष्टकरी स्त्री असते. भोळे भाबडे भक्त असतात. तत्त्वज्ञ असतात. विचारवंत असतात. समाजशास्त्रज्ञहीअसतात.वारकरी संप्रदाय हे उदार, चिंतनशील, संस्कारजन्य भक्तांना सामावून घेणारे उपासनापीठ आहे. धार्मिक प्रबोधनाच्या प्रेरणेतून तो जन्माला आला. ज्ञानेश्वर, तुकाराम इ. संतांचे कार्य केवळ सांप्रदायिक स्वरूपाचे नसून ती एक व्यापक चळवळ होती.पंढरपूरचा पांडुरंग हे त्यांचे उपास्यदैवत. प्रत्येक वारकºयाच्या मनामध्ये असणारी विठ्ठलभेटीची आस वारीतून पूर्ण होते. यात सर्व जातिधर्माचे, पंथाचे स्त्री-पुरुष असतात. जन्मसिद्ध अधिकार, उच्चनीचतेला यात थारा नसतो.आत्मसंस्कार, आत्मानंद, आत्मशोध यासाठी धडपडणाºया माणसासाठी वारी हा एक शोध आहे. कोणत्याही प्रकारच्या अभिमानाला येथे जागा नाही. सर्व प्रकारच्या उपाधी झुगारून ईश्वरापुढे एक माणूस म्हणून नम्र होणे येथे आहे.स्वार्थांधता, जीवघेणी स्पर्धा, कुटुंबसंस्थेचे विघटन, शहरांचे बकालपण, हिंस्रता, सर्वांना वेढून टाकणारा एकाकीपणा या गोष्टी आधुनिक काळात दर दिवशी वाढत आहेत.बौद्धिक विकास झाला; परंतु नैतिकता उंचावली गेली नाही. उलट अलीकडच्या काळात ती क्षीण क्षीण होताना दिसत आहे.‘जे जे भेटे भूत,ते ते मानिजे भगवंत’म्हणून आपली विचारांची कक्षा व्यापक करणारा, निसर्गाचे सान्निध्य लाभल्यामुळे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’चा अनुभव साक्षात करणारा वारी हा एक समृद्ध करणारा अनुभव आहे. मराठी भाषा, साहित्य-संस्कृती याविषयी स्वत्वाची भावना निर्माण करून सामाजिक सामरस्याची भावना त्यामुळे जागवली जाते. वारकºयाचा भक्तिभावनेने ओथंबलेल्या मनाचा हा अंत:स्तरावरचा प्रवास मला महत्त्वाचा वाटतो.(लेखक संत साहित्याच्या अभ्यासक)

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रम