शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

द्राक्षे पंढरीतील बळीराजा व्यापाऱ्यांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 18:27 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे ...

ठळक मुद्देलखमापूर : लॉकडाउनची शेतकरी वर्गाने घेतली मोठी धास्ती

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला संपूर्ण जिल्ह्यात धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे जवळ जवळ ८० टक्के शेतकरी वर्गाने द्राक्षे पिकांला पसंती दिली आहे. तसेच शेतीसी निगडीत व्यवसाय करीत आहे. परंतु सध्याच्या मितीला दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्ग अतिशय खडतर मार्गातुन द्राक्षे पिके वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करीत आहे.दिंडोरी तालुक्यात द्राक्षे व उस हे पिक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.त्यात नगदी पैसा मिळुन देणारे पिक द्राक्षे वर्षभर मेहनत करून घेतले जाते. तेव्हा उत्पन्नांचे पैसे हातात पडतात. भरपूर भांडवल, अतिशय महागडे औषधे, मोठ्या प्रमाणात खर्च, हे सर्व समीकरण जुळून द्राक्षे पिक घेतले जाते. परंतु तयार झालेले द्राक्षे जेव्हा बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्याची वेळ येते. तेव्हा मात्र द्राक्षे उत्पादक शेतकरी वर्गाला मोठी कसरत करावी लागते.                     शेतकरी वर्गाची खरी लुटमार सुरु होते, ती द्राक्षे तयार झाल्यानंतर व्यापारी शोधण्यापासुन त्यात चांगला व्यापारी मिळणे, त्याने फसवणूक न करता चांगला भाव मिळून देणे हे महत्वाचे ठरत आहे. आता तर द्राक्षे पिके तयार झाल्यानंतर दलालीमुळे आपल्या द्राक्षे पिकांला चांगला भाव मिळावा म्हणून दलालांच्या विनवण्या कराव्या लागतात. त्याकरिता टक्केवारीची भाषा बोलण्यात येऊन नविन अमिष दाखविण्यात येते. दुसरीकडे परप्रान्तीय व्यापारी दलालांना जास्त कमीशनचे अमिष दाखवून शेतकरी वर्गाकडून द्राक्षे माल विकत घेतात. प्रत्यक्ष माल काढण्याच्या वेळी चांगला भाव देण्याचा व सूरुवातीला चांगला द्राक्षे माल काढून घ्यायचा नंतर मात्र माल लवकर खराब होतो व आहे, भाव नाही,मालाला उठाव नाही, बाजारपेठेत माल विकला जात नाही अशी वेगवेगळे बहाणे करून अर्धवट बाग काढणी बंद करणे. हा अर्धवट शिल्लक राहिलेला माल दुसरा कोणी व्यापारी घेत नाही. मग मिळले त्या कवडीमोल भावाने पैसा पदरात पाडून घेण्याकरीता शेतकरी माल देण्यासाठी तयार होतो.निर्यातीसाठी द्राक्षे उत्पादनांसाठी उत्पादकांना कमीत कमी ३० ते ४० रुपये प्रति किलो सरासरी खर्च पडतो.तसेच अनेक अस्मानी व सुलतानी संकटे, वातावरणातील बदलाव, अवकाळी पाऊस, नैसर्गिक आपत्ती, अशा शंभर संकटातून बागा वाचून द्राक्ष निर्यातीसाठी तयार होतात. आणि तेव्हा शेतकऱ्यांना मोठा ज्या निर्यातदार संस्थेशी किंवा कंपनीशी द्राक्षविक्रीचा व्यवहार केलेला असेल, त्या कंपनीचा कर्मचारी स्वतः बागेत येऊन माल योग्य तयार झाला की नाही यांची खात्री करून घेतात.              द्राक्षांमध्ये कोणताही विषारी रासायनिक अंश शिल्लक नाही. याची खात्री करून घेतात.तसेच यासाठी द्राक्षांची नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविले जातात.त्यासाठी खर्चाचे वेगवेगळ्या स्वरूपाची रक्कम आकारली जाते. हा खर्च देखील शेतकरी वर्गाच्या माथी टाकला जातो.प्रत्यक्षात दोन-दोन महिने उलटून गेले तरी पैसे मिळत नाही. बँकेचे चेक दिले तर अपुरी रक्कमेमुळे बाऊन्स होतात. असे अनेक संकटे द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला भोगावे लागत आहे. त्यामुळे सध्या द्राक्षे उत्पादक बळीराजा ला चांगल्या व प्रामाणिक व्यापारी वर्गाची प्रतिक्षा लागली आहे.(१३ ग्रेप्स १)

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी