उमराणे : मालेगाव शहरात एका कोरोनाबाधिताचा झालेला मृत्यू आणि शिवाय आणखी चार जण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहर व परिसरातील खेडोपाडी ग्रामस्थांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. त्यामुळे मालेगाव शहराच्या आसपास असलेल्या गावांनी आपल्या सीमा सील करण्यास सुरू वात केली असून सटाणा, कळवण, मनमाड तसेच नांदगाव आदी शहरात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.उमराणे गाव हे मालेगावपासून अवघ्या २५ कि.मी. अंतरावर आहे. मालेगाव येथे कोरोनाने शिरकाव केल्याने खबरदारी म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने पुन्हा गावाच्या सीमा सील केल्या असून, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने बाजार समितीही बेमुदत बंद करण्याचे लेखी निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे पुढील शासन निर्णय होईपर्यंत बाजार समिती प्रशासनाने बाजार समिती बेमुदत बंद करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण गाव लॉकडाउन असताना शासनाच्या आदेशान्वये मंगळवारी येथील बाजार समितीचे लिलाव पूर्ववत सुरु करण्यात आले होते, मात्र दररोज पाचशे वाहनांची मर्यादा असल्याने टोकन मिळविण्यासाठी तसेच कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. त्यामुळे गाव लॉकडाउन असतानाही लॉकडाउन यशस्वी होत नव्हते. त्यातच मालेगाव येथे कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आणि आणखी चार बाधित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या वतीने बाजार समितीला लिलाव बंद ठेवण्यात यावे यासंबंधीचे लेखी निवेदन देण्यात आले. त्यापाठोपाठ ग्रामपंचायत प्रशासन व व्यापाऱ्यांनीही बाजार समिती बंद ठेवण्याचे निवेदन देण्यात आल्याने प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर बाहेरगावाहून येणाºया वाहनांनाही बंदी घालण्यात आली असून, गावच्या चोहीकडील रस्त्यांवर बॅरकेड्स व काटेरी झुडुपांच्या फांद्या टाकून सीमा सील करण्यात आल्या आहेत.घरातच पूर्वजांसाठी दुवापठणमालेगाव : शहरात कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली असून संचारबंदी कठोरपणे जारी केल्याने मुस्लीम बांधवांनी घरीच बसून शब-ए-बारात साजरी केली. संचारबंदीमुळे शहरातील सर्वच रस्ते बंद करण्यात आले असून शहरातील कबरस्तानाजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शहरातील सामाजिक कार्यकर्ते मौलाना आणि धर्मगुरूंनी नागरिकांना घरातच बसून नमाज पठण आणि पूर्वजांसाठी दुवापठण करण्याचे आवाहन केले होते त्यामुळे सहसा कुणी घराबाहेर पडले नाही. शहरातील मशिदीमधूनही नागरिकांना घरातच ईबादत करण्याचे आवाहन केले जात होते.नांदगावी वाहनांची कडक तपासणीनांदगाव : मालेगाव येथे कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मालेगावकडून येणाºयावाहनांची कडक तपासणी प्रशासनाने सुरु केली असून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांनाच तालुक्यात प्रवेशदिला जात आहे. कोरोना संशयितांचे सात नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार नमुन्यांचा तपासणी अहवाल नकारात्मक आला असून तीन नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. साकोरे,न्यायडोंगरी येथील मोठ्या रेशन दुकानातून एप्रिल महिन्याचे धान्य वाटप पूर्ण झाले असून पुढील वाटपासाठी आदेशाची प्रतीक्षा असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे यांनी दिली. तालुक्यातून जेसात नमुने पाठविण्यात आले त्यापैकी सहा व्यक्ती निजामुद्दीन घटनेशी संबंधित असल्याची प्राथमिकमाहिती आहे.कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने आपली जबाबदारी आता वाढली आहे. कुणीही विनाकारण फिरू नका.कोरोना पसरणार नाही याची काळजी घ्या. दिवस कठीण आहेत. प्रशासनाला कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- मौलाना मुफ्ती मोहमद इस्माईल, आमदार
अनेक गावांच्या सीमा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:24 IST
मालेगाव शहरात एका कोरोनाबाधिताचा झालेला मृत्यू आणि शिवाय आणखी चार जण कोरोनाबाधित आढळून आल्याने शहर व परिसरातील खेडोपाडी ग्रामस्थांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे. त्यामुळे मालेगाव शहराच्या आसपास असलेल्या गावांनी आपल्या सीमा सील करण्यास सुरू वात केली असून सटाणा, कळवण, मनमाड तसेच नांदगाव आदी शहरात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
अनेक गावांच्या सीमा सील
ठळक मुद्देमालेगावी कोरोनाचा बळी : उमराणेला बाजार समितीत लिलाव बंद