सिडको : महापालिकेच्या सिडको विभागाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टीची मिळून सुमारे चौदा कोटी रुपयांची वसुली केली असून, थकबाकी न भरणाऱ्या ४० मिळकती सील करण्यात आल्या आहे, तर सुमारे २५ हून अधिक थकबाकीदारांचे नळ कनेक्शन्स बंद करण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही महापालिक ा सिडको विभागाच्या वतीने मार्च अखेर दिलेली घरपट्टी व पाणीपट्टीची उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी धडक वसुली मोहीम सुरू केली होती. तसेच बड्या थकबाकीदारांकडे ढोल बजाव आंदोनलही करण्यात आले. सिडको विभागात निवासी व व्यावसायिक मिळून सुमारे ९५ हजार ५१० मिळकती असून, मार्च अखेरपर्यंत या मिळकतधारकाकंडून घरपट्टीचे १५ कोटी ८६ लाख इतके उद्दिष्ट देण्यात आले असून, यापैकी ३० मार्चपर्यंत सुमारे ११ कोटी वसुली झाली आहे तर अजूनही सुमारे ४ कोटी ८६ लाख इतकी थकबाकी आहे. तर पाणीपट्टीचे उद्दिष्ट ७ कोटी ७० लाख इतके असून, आजपर्यंत ३ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली आहे. अजूनही ४ कोटी २० लाख इतकी थकबाकी आहे. एकूण घरपट्टी व पाणीपट्टीच्या २३ कोटीपैकी आजपर्यंत १४ कोटी ५० लाख इतकी वसुली झाली असून, अजूनही मनपास सुमारे ९ कोटी रुपयांची वसुली करणे बाकी आहे. मनपाच्या वतीने ज्या थकबाकीदारांंकडे थकबाकी आहे अशा अनेक थकबाकीदारांना अंतिम नोटीस देऊन थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते, परंतु अंतिम मुदत देऊनही थकबाकी न भरणाऱ्या २० निवासी व २० व्यावसायिकांच्या मिळून सुमारे ४० मिळकती जप्त करण्यात आल्या आहेत. थकबाकीची वसुली मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून, थकबाकीदारांनी थकबाकी भरून कारवाई टाळावी. - सुनीता कुमावत, विभागीय अधिकारी, मनपा सिडको विभागढोल बजाव आंदोलनामुळे वसुलीत वाढमनपाच्या वतीने यंदाच्या वर्षी बड्या थकबाकीदारांना अंतिम नोटीस बजावूनही थकबाकी भरली नाही, अशा थकबाकीदारांच्या समोरच ढोल बजाव आंदोलन केल्याने अनेक बड्या थकबाकीदारांनी थकबाकी भरल्याने वसुलीत वाढ झाली.मनपा सिडको विभागास चालू वर्ष वगळता याआधीच्या वर्षाची घरपट्टी व पाणीपट्टीची एकूण ३० कोटींची थकबाकी आहे. यापैकी मनपाच्या वतीने चालू वसुलीबरोबरच मागील थकबाकीमधील सुमारे ६ कोटी घरपट्टी व ३ कोटी पाणी पट्टी अशी एकूण ९ कोटी वसुली झाली आहे.
४० मिळकतींना सील
By admin | Updated: March 31, 2017 23:19 IST