शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 01:10 IST

नाशिकरोड : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अण्णा हजारे मार्गावर भाजी घेणा-या एका व्यक्तीवर दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याला सराईत गुन्हेगार बाबा शेखच्या खुनाची पाश्वर्भूमी असल्याची जोरदार चर्चा होत असून नाशिकरोड-जेलरोड भागात टोळीयुध्दाचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. हे टोळीयुद्ध रोखण्याचे नाशिकरोड, उपनगर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्देटोळी युद्धाचा भडका : या हल्ल्याला 'त्या' खूनाची पाश्वर्भूमीची चर्चा

नाशिकरोड : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अण्णा हजारे मार्गावर भाजी घेणा-या एका व्यक्तीवर दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याला सराईत गुन्हेगार बाबा शेखच्या खुनाची पाश्वर्भूमी असल्याची जोरदार चर्चा होत असून नाशिकरोड-जेलरोड भागात टोळीयुध्दाचा भडका उडाल्याचे बोलले जात आहे. हे टोळीयुद्ध रोखण्याचे नाशिकरोड, उपनगर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.एकलहरारोड, मगरमळा येथे राहणारे हुसेनअली उर्फ बबलू मेहबूबअली महमंदअली (54) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोरील अण्णा हजारे मार्गावर शनिवारी (दि.3) दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवर ते भाजी घेण्यास आले होते. त्यावेळी संशयित अक्षय नाईकवाडे, गोविंद संजय साबळे, हुसेन शेख व त्यांचे इतर तीन साथीदार दोन मोटरसायकलवर हुसेनअली यांच्याकडे आले. हुसेनअली यांना हाताने पकडुन अक्षय याने कोयत्याने दोन्ही हातावर वार करुन जखमी केले. झटापटीत हुसेनअली यांच्या नाकाला देखील दुखापत झाली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. ही घटना भर दुपारी तेदेखील नाशिकरोड पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर घडल्याने या भागात 'खाकी'चा दरारा संपुष्टात आला की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.प्राणघातक हल्ल्याने पांडेय यांचे स्वागतपरिमंडळ-2मध्ये प्राणघातक हल्ल्याने जणू गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांचे स्वागत केल्याची चर्चा आहे.उपनगर पोलिस ठाण्यात पोलिस आयुक्त दिपक पांडे यांचा जनता दरबार सुरु असतानाच हा हल्ला घडला. वदर्ळीच्या ठिकाणी पोलीस ठण्यापासून जवळच भर दुपारी हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करण्यापर्यंत मजल गेल्याने कायदा सुव्यवस्था धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच सिन्नरफाटा येथिल सराईत गुन्हेगार बाबा शेख याची डिजीपीनगर ला गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. या खूनातील फरार संशयित टिप्पू हा कुठे हा आहे, अशी विचारणा करुन हुसेन अली यांच्यावर कोयत्याने वार केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. यामुळे या हल्ल्याला बाबा खून प्रकरणाची पाश्वर्भूमी असलयाची चर्चा नाशिकरोड भागत सुरु आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे