शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
4
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
5
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
6
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
7
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
8
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
9
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
10
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
11
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
12
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
13
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
14
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
15
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
16
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
17
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
18
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
19
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
20
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
Daily Top 2Weekly Top 5

रेखाकला परीक्षेपासपासूनआठ विद्याथी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 17:36 IST

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देपालकांकडून तीव्र संताप: दहावीच्यागुणपत्रिकेतमिळणाऱ्यागुणांपासूनविद्यार्थीवंचित

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातकालपासून सुरू झालेल्या शासकीय रेखाकला परिक्षेपासून आठ विद्यार्थी वंचित राहिल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शासनाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शासकीय रेखाकला परिक्षा घेण्यात येतात.त्यासाठी इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा या परिक्षेत सहभाग असतो.या परिक्षेत एलिमेंट्री - दोन पेपर (दोन दिवस) त्यानंतर एंटरिमजिएट - दोन पेपर (दोन दिवस) असे चार पेपर चिञकलेचे असतात. दहावीची परिक्षा दिल्यानंतर पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येकी २१मार्क दिले जातात म्हणजे ३टक्केया परिक्षेत पास झाल्यानंतर मिळतात.त्यामुळे नापास होणारा विद्यार्थी कींवा पुढच्या शिक्षणासाठी टक्केवारी कमी पडल्यास या परीक्षेचा फायदा होतो.त्यासाठी नांदगाव तालुक्यातील मनमाड, नांदगाव- व्हि.जे.हायस्कूल, तसेच ग्रामीण भागासाठी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालय अशा तीन ठीकाणी केंद्र ठरविण्यात आले आहे.पैकी साकोरा येथिल माध्यमिक विद्यालयात तालुक्यातील एकुण सोळा शाळेतील विद्यार्थी परीक्षार्थी आहेत.त्यासाठी प्रत्येक शाळेच्या कलाशिक्षक व मुख्याध्यापक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची परिक्षा फी ६०रूपये जमा करून २२आॅगष्टपर्यंत आॅनलाईन फार्म भरणे अनिवार्य होते.मात्र साकोरा येथिल रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाने पाचवी ते दहावीच्या एकुण १९७ विद्यार्थ्यांकडून परिक्षा फी जमा करून ती मुदतीच्या आत भरली नसल्याचेपालकांनीसांगितले.शिवाय एक महिन्यांपूर्वी हेअर्जभरणारे शिक्षक आजारी पडल्याने ते गैरहजर आहेत.त्यामुळे सदर विषयाचा एकही तास झाला नसून कोणी मार्गदर्शन देखिल न करता अचानक कालच या परीक्षेची माहिती शाळेत मिळाल्याने शाळेत खळबळ उडाली.मात्र गावातील नितीन ठुबे या शिक्षकांनी त्वरित सदर सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज भरून एकुण ९९ विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी बसविण्याचा प्रयत्न केला.परंतू आठ विद्यार्थ्यांनी पैसे भरूनही या परिक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.तसेच यापूर्वी देखिल सन २०१५ - २०१६व २०१६-२०१७ या वर्षी देखिल शाळेच्या ढिसाळ नियोजनाचा प्रत्यय आला असून त्यांनी मुदतीनंतर अर्ज दाखल केल्याने एकुण५५विद्यार्थी या२१गुण ( 3टक्के) मिळविण्यापासून वंचित राहिल्याने अनेकांना शिक्षणासाठी अडचणी आल्याचे काहीमाजी विद्यार्थ्यांनी सांगितले.