शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
2
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
3
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
4
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
5
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
6
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
7
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
8
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
9
कपडे फाडले; लाथा मारल्या, धमकी दिली, जगतापांनी आयोगाला दिलेल्या तक्रार अर्जात धक्कादायक बाबी समोर
10
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
11
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
12
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  
13
४ ग्रह, ४ राजयोग: १० राशींवर लक्ष्मी प्रसन्न, भरघोस भरभराट; बक्कळ पैसा, बंपर लाभ, वरदान काळ!
14
धक्कादायक! गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने पती चिडला, पत्नीवर फेकले टॉयलेट क्लीनर
15
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बनवले तरुणींचे अश्लील व्हिडीओ; ७ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
16
ऑपरेशन सिंदूर: सैन्याने IPS अधिकाऱ्याचा सन्मान का केला? पाकिस्तानचा रहीम यार खान एअरबेस जवळच होता...
17
Somavati Amavasya 2025: पितरांच्या फोटोची जागा तर अयोग्य नाही? सोमवती अमवास्येला करा बदल!
18
Nuclear Weapon : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचं नुकसान झालं? पाकचं परराष्ट्र मंत्रालय म्हणतंय... 
19
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
20
Corona Virus : मास्क लावायला हवा का, बूस्टर डोसची गरज आहे का, कोरोनाचा JN.1 व्हेरिएंट किती संसर्गजन्य?

इमारत बांधकाम वादावर पडदा

By admin | Updated: January 7, 2017 00:50 IST

चांदवड : आमदारांच्या अनुपस्थितीत मुहूर्त साधला

चांदवड : चांदवड पंचायत समितीच्या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. ही इमारत त्याच जागी बांधावी की प्रशासकीय इमारतीकडे बांधावी असे दोन प्रवाह असताना अखेर चांदवड पंचायत समितीची इमारत त्याच जागी करण्याची मान्यता मिळाली खरी, पण तिच्या भूमिपूजनाला काही केल्या मुहूर्त सापडत नव्हता. अखेर दि. २ जानेवारी रोजी या पंचायत समितीचे भूमिपूजन करण्याचा घाट घालण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती अनिता जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार उत्तम भालेराव व शिरीष कोतवाल, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य ज्योती माळी, बंडू गांगुर्डे, विलास माळी, दादाभाऊ अहिरे, पंचायत समिती सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, यू. के. अहेर, अनिल काळे, शिवाजी कासव, चंद्रकांत गवळी, उपसभापती मनीषा जाधव, मंगला बर्डे, बाकेराव जाधव, विजय जाधव, अरुण न्याहारकर, बाळासाहेब माळी, शहाजी भोकनळ, सुखदेव जाधव, आर. डी. थोरात, भीमराव जेजुरे, राजेंद्र गिडगे आदि मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन यू. के. अहेर यांनी, तर प्रास्ताविक अनिल काळे यांनी केले. यावेळी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सभापती अनिता जाधव, डॉ. सयाजीराव गायकवाड यांची भाषणे झाली. तुकाराम सोनवणे यांनी आभार मानले. यावेळी ठेकेदार एन. एच. अथरे, भल्ला यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास निवृत्ती घाटे, उत्तमराव ठोंबरे, चंद्रकांत पाटील, शांताराम घुले, नवनाथ जाधव, रावसाहेब भालेराव, संजय पाडवी, अनिल भालेराव, म्हसू गागरे, दत्ता वाघचौरे, भीमराव निरभवणे, समाधान जामदार, अल्ताफ तांबोळी, अन्वर शहा, भाऊसाहेब जोरे, निवृत्ती व्यवहारे, अनिल पवार, प्रकाश शेळके, शरद अहेर आदिंसह नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)