शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 13:14 IST

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी(दि.२२)पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देनाशकातील शाला 4 जानेवारीपर्यंच बंदचजिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठक कोरोनाचा प्रभाव, पालकांचा विरोध लक्षात घेऊन निर्णय

नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रभाव आणि पालकांचा विरोध लक्षात घेऊन जिल्ह्यातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार प्रशासनाकडून २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याची तयारी करण्याच येत असताना पालकांचा मात्र शाळा सुरू करण्यासाठी तीव्र विरोध होता. यासंदर्भात शिक पालक संघटनेने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या निवेदन देऊन विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास प्रशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल केला होता. त्यानंतर शाळा शुरू करण्याबाबत निर्णय घेण्यसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत रविवारी(दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हायातील शाळा ४ जानेवारीपर्यंत बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवण्याची मागणी नाशिकमधील पालकांकडून करण्यात आली होती. सध्या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी पालकांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती निर्माण झाली असून, त्यामुळे पालकांकडून शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध होत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात अजूनही शासनाकडे पुरेशा सुविधा उपलब्ध नाही. शासनाच्या तुटपुंज्या यंत्रणा असताना खासगी रुग्णालयांचे उपचार सामान्यांना परवडणारेही नसल्याने अशा बिकट परिस्थितीत २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू न करता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत बंद ठेवण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयSchoolशाळाChagan Bhujbalछगन भुजबळ