शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

शाळांना पुस्तकांची प्रतीक्षा क ायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:17 IST

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. कोरोनाच्या संकटात यावर्षी सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही, असे असले तरी पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाची परंपरा कायम राखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचे नियोजन केले होते.

नाशिक : समग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येते. कोरोनाच्या संकटात यावर्षी सोमवारपासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली कोणत्याही शाळेत विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले नाही, असे असले तरी पहिल्याच दिवशी पुस्तक वितरणाची परंपरा कायम राखण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या पालकांना पाठ्यपुस्तके वितरीत करण्याचे नियोजन केले होते. मात्र अद्याप शहरातील केंद्र शाळांनाच पुस्तकांचा पुरवठा झाला नसल्याने शाळास्तरावरही पुस्तकांची प्रतीक्षा कायम आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात शिक्षण विभागाचे दोन भाग असून, यातील नाशिक शहर भाग एकमध्ये तर नाशिकरोड व सिडको भाग दोनमध्ये आहे. या दोन्ही भागांमध्ये पुस्तकांसाठी दोन स्वतंत्र गुदामे आहेत. शहर परिसरात गायकवाडनगर येथील शाळा क्रमांक ३४ येथील गुदामातून पुस्तकांचा पुरवठा होतो, तर नाशिकरोड व सिडको भागासाठी जेतवननगर येथील शाळा क्रमांक ५५ येथून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. या दोन्ही गुदामांमधून महापालिकेच्या व खासगी अनुदानित अशा मिळून सुमारे १७२ शाळांना २४ केंद्रांच्या माध्यमातून पुस्तकांचा पुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी अद्याप गुदामांमधून केंद्रस्तरावर पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. त्यामुळे शाळांना पुस्तकांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा शिक्षणविभाग अनभिज्ञ असून, शहरातील शाळांना पुस्तक वितरणासंदर्भात प्रभारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे कोणतीही माहिती नसल्याचे समोर आहे.---------------------बालभारतीकडून पुरवठ्यास उशीरकोरोनामुळे पुस्तकांची छपाई व वाहतूक प्रक्रियेत आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध होऊ न शकल्याने बालभारतीकडूनच यावर्षी पुस्तकांचा पुरवठा उशिरा झाल्याचे पुस्तक वितरण विभागातील सूत्रांनी सांगितले. समग्र शिक्षण अभियानांतर्गत मिळणारी पुस्तके आता गुदामात पोहोचली असून, दोन दिवसांत ती सर्व केंद्रांवर उपलब्ध होणार आहे. त्यानंतर सुमारे आठवडा भराच्या कालावधीत ही पुस्तके शाळांना उपलब्ध होऊ शकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.------------------------एकात्मिकच्या पुस्तकांची अजूनही प्रतीक्षासमग्र शिक्षण अभियानांतर्गत दिली जाणारी पुस्तके गुदामांपर्यंत उपलब्ध झाली आहे. परंतु, एकात्मिक पाठ्यपुस्तके अजूनही बालभारतीच्या कार्यालयास उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे एकात्मिक पाठ्यपुस्तकांच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या नाशिक भाग दोन व मालेगाव व निफाड तालुक्यांतील शाळांना पुस्तक ांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक