शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

शाळेचे काम पंधरा हजारांचे, बिल दीड लाखांचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 20:18 IST

दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो.

ठळक मुद्देधागुर : पेसाच्या कामात भ्रष्टाचाराचा ग्रामपंचायतीचा आरोपएकाच दिवसात शाळेच्या छतावर पंधरा सीमेंटचे पत्रे टाकले.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : नाशिक व दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जुने धागुर गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीत ग्रामसेवकाच्या मदतीने ठेकेदाराने मोठ्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून, पंधरा हजार रुपयांचे काम असताना ठेकेदाराने दीड लाख रुपये खर्च दाखविल्याने ठेकेदाराला रक्कम अदा करण्यास सदस्यांनी विरोध दर्शविला आहे.

दिंडोरी तालुक्यातील जुने धागुर हे गाव पूर्णत: आदिवासी असल्यामुळे ते पेसा अंतर्गत मोडले जाते. शासनाकडून पेसा अंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला जातो. गावातील प्राथमिक शाळा सध्या पावसाळ्यात गळत असल्याने विद्यार्थ्यांचे होणारे हाल पाहता ती दुरुस्त करावी, अशी गावकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने पेसा अंतर्गत प्राप्त रकमेतून शाळा दुरुस्तीसाठी दीड लाखाच्या कामाला मंजुरी दिली व त्याचा रीतसर ठेका देण्यात आला. संपूर्ण शाळेची दुरवस्था झालेली असताना ठेकेदाराने सर्वच कामे करणे अपेक्षित असताना त्याने एकाच दिवसात शाळेच्या छतावर पंधरा सीमेंटचे पत्रे टाकले. त्याचे दीड लाखाचे बिल ग्रामपंचायतीला दिले. मुळात पंधरा पत्र्यांची किंमत साडेसात हजार होत असून, मजुरी धरून पंधरा हजार रुपये होत असताना ग्रामसेवकाने दीड लाखाचे बिल मंजूर करून रकमेचा धनादेश कसा काढला असा सवाल पेसा अध्यक्ष चंदर तात्या ढोले यांनी उपस्थित केला आहे. कामाचे बिल मिळावे म्हणून ठेकेदाराने राजकीय दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र ग्रामस्थांनी शाळेच्या कामाबद्दल आक्रमक पवित्रा घेतला असून, काम पूर्ण दीड लाखाचे करा अन्यथा धनादेश देण्यास विरोध दर्शविला आहे.---

टॅग्स :Schoolशाळाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद