शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

आता दोन सत्रात शाळा सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 00:02 IST

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील शाळा अजूनही बंद ठेवण्यात आल्या असून, शाळा कधी सुरू होणार याविषयीची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. असे असले तरी शाळा दोन फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या उद्देशाने महाराष्टÑातील शाळा दोन सत्रात सुरू करण्याची शक्यता आहे. शिक्षक संघ आणि संस्थाचालकांनी याबाबतची अनुकूलताही दर्शविली आहे.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सध्या अशा क्षेत्रामधील शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव हा राहणारच असल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा या दोन सत्रात सुरू करण्याबाबतची अनुकूलता दर्शविण्यात आली आहे. कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या संचालकांनी शाळांमध्ये सामासिक अंतर राखण्यासंबंधी मार्गसूची जारी केली असून तशाच प्रकारे सूचना अमलात आणून महाराष्टÑातही शाळा सुरू करण्याबाबतचे विचारमंथन सुरू झाले आहे. कर्नाटक शिक्षण बोर्डाने शाळा दोन सत्रात सुरू करण्याबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षितता तसेच फिजिकल डिस्टन्ससाठी घेतलेले निर्णय महाराष्टÑातही राबविले जाण्याची शक्यता आहे. तसे झाले तर दोन सत्रात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण संस्थांना मोठी तयारी करावी लागणार असून, वर्ग खोल्या आणि शिक्षकांची तरतूद अगोदरच करावी लागणार आहे. सकाळचे सत्र ७.५० तर दुपार सत्राची शाळा १२.१० ला सुरू होणार आहे.कर्नाटक सरकारच्या निर्णयानुसार दोन सत्रांमध्ये शाळा भरविण्यात येणार असली तरी शिक्षकांनादेखील एका सत्रात काम करावे लागणार आहे. मात्र पहिली ते सातवी, आठवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळांमध्ये दोन सत्रात शाळा भरवावी लागणार आहे. आठवी ते दहावीपर्यंतच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्ग खोल्यांची कमतरता असल्यास तेथेदेखील दोन सत्रात शाळा भरवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शिक्षकांची कमतरता भासत असेल तर स्थानिक परिसरातील अतिथी शिक्षकांची नेमणूक करता येणार आहे.------------कर्नाटक सरकारने दोन सत्रात शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच आहे . महाराष्ट्रातही सामासिक अंतर राखून, मुलांची शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुरक्षितता बघून शाळा दोन सत्रात सुरू करण्यास हरकत नाही. शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक, पालक, शिक्षक यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.- एस. बी. देशमुख, सचिव,पश्चिम महाराष्टÑ राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे

टॅग्स :Nashikनाशिक