शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

शालेय विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून हाल

By admin | Updated: April 7, 2016 23:56 IST

मालेगाव : बहुतांश शाळांमध्ये पाण्याअभावी गैरसोय

समाधान शेवाळे वडनेरमालेगाव शहरातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत असल्यामुळे पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरात शाळा- महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असताना शहरात मोठे शैक्षणिक संकुल व विविध शैक्षणिक संस्था असल्यामुळे शिक्षणासाठी शहराचा नावलौकिक वाढला आहे.सध्या मालेगावच्या तपमानात दिवसेंदिवस वाढ होत असून सुमारे ४३ अंशापर्यंत तपमान गेल्याने उष्माघाताने जगणे असह्य झाले आहे, असे असतानाही शहरामध्ये असलेल्या नामांकित शाळा-महाविद्यालयांमध्ये साध्या पिण्याच्या पाण्याचीही सोय नसल्याचे दिसून येत आहे. शहरामध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत असतात. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने घसा कोरडा पडत असून पाण्याची तहानही वाढत असते. विद्यार्थी घरूनच पाण्याची बाटली घेऊन येतात परंतु पाण्याची तहान वाढल्याने ती बाटली लवकरच संपते. अशा स्थितीत काही शाळा-महाविद्यालयांमध्ये पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत आहे.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये पाण्याची सोय नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेशाच्या वेळी विविध सोयीसुविधांचे दर्शन घडविले जाते परंतु काही दिवसातच अशी परिस्थिती उद्भवते त्यामुळे भर उन्हाळ्यात शाळा- महाविद्यालयांकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे.