शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शाळांचा अल्पसंख्याक दर्जासाठी खटाटोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 00:56 IST

आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या क्लिष्ट अटी व अवेळी मिळणारी प्रतिपूर्ती याला कंटाळून अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा खटाटोप करीत असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देगळती होण्याची शक्यता : नवीन शाळा नोंदणीसाठी उत्सुक

नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या क्लिष्ट अटी व अवेळी मिळणारी प्रतिपूर्ती याला कंटाळून अनेक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवून शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा खटाटोप करीत असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.आर्थिक दुर्बल व मागास प्रवर्गासाठी शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये एकू ण क्षमतेच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जात असून, या जागांवर प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून केली जाते. परंतु, पूर्वानुभवानुसार शाळांना प्रतीपूर्तीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी तीन ते चार वर्षांची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शाळांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने काही शाळा बंद पडल्या आहेत. तर काही शाळांनी अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करून या प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे गेल्यावर्षातील आरटीईअंतर्गत ४५७ शाळांमध्ये यावर्षी गळती होण्याची शक्यता आहे. परंतु नव्याने सुरू झालेल्या तसेच विद्यार्थ्यांची कमतरता भासणाºया शाळांनी नव्याने आरटीई प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणीप्रक्रियेत सहभाग घेतल्याने गेल्यावर्षी आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या ५ हजार ७६४ जागांचा आकडा कायम राहण्याचा अंदाज शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.पाच हजार जागांसाठी आरटीईअंतर्गत प्रवेशआतापर्यंत आरटीई पोर्टलवर ४२५ शाळांची नोंदणी झाली असून, या शाळांमध्ये ५ हजार ३४६ जागांवर आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार आहे. त्यासाठी पालकांना त्यांच्या पाल्यांच्या प्रवेशासाठी ११ ते २९ फेब्रुवारी या १५ दिवसांच्या कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्याची संधी मिळणार असून, त्यानंतर ११ व १२ मार्च असे दोन दिवस लॉटरी काढण्याची प्रक्रिया चालणार आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण