शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

३६५ दिवस अन् १२ तास चालणारी शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:05 IST

पेठ : शाळा म्हटले म्हणजे घंटा ही आलीच. आणि ज्या शाळेत घंटा तेथे वेळचा टोल आलाच. सरकारी वेळापत्रकाप्रमाणे चालणाऱ्या शाळा आपण बघितल्या आणि अनुभवल्याही असतील. मात्र वर्षाच्या ३६५ दिवस आणि १२ तास सुरू असलेली बिनकुलूपाची शाळा म्हणजे विशेषच.

ठळक मुद्देहिवाळी प्राथमिक शाळा : येथे घडविले जातात देशाचे भावी नागरिक

रामदास शिंदेपेठ : शाळा म्हटले म्हणजे घंटा ही आलीच. आणि ज्या शाळेत घंटा तेथे वेळचा टोल आलाच. सरकारी वेळापत्रकाप्रमाणे चालणाऱ्या शाळा आपण बघितल्या आणि अनुभवल्याही असतील. मात्र वर्षाच्या ३६५ दिवस आणि १२ तास सुरू असलेली बिनकुलूपाची शाळा म्हणजे विशेषच.हिवाळी हे हरसूल पासून जवळपास ४० किमी. अंतरावर असलेले गुजरात राज्याच्या सिमेवर असलेले अतिदुर्गम गाव. चोहीकडे डोंगरांनी वेढलेल्पा या गावात आकाश आणि जमिन एवढेच काय ते दिसणार. केशव गावीत नावाच्या तरु ण शिक्षकाची येथे १० वर्षापूर्वी नियुक्ती झाली. आपल्या उच्च शिक्षणाचा व प्राप्त केलेल्या ज्ञानाचा या शिक्षकांने आदिवासी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदूपयोग करण्याचा चंग बांधला.विविध अध्ययन अध्यापनातील क्लुप्त्या व शैक्षणिक साधनांचा वापर करून या शिक्षकाने परिपूर्ण असे शैक्षणिक ज्ञान मंदीर निर्माण केले. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तास अन् ३६५ दिवस चालणाºया या शाळेची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे.साधारण ३ वर्ष वयोगटापासून गावातील बालकांचे पाय या शाळेकडे ओढले जातात. ज्या मुलांना बडबड गीते शिकवतांना शिक्षकांना घाम निघतो त्याच मुलांना केशव गावीत 30 पर्यंतचे पाढे म्हणायला शिकवतात. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी व शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी दिवाळी निमित्त सुटीच्या काळात या शाळेला भेट दिली असता. शाळेचे कामकाज नियमितपणे सुरू होते. बालवाडीच्या एका विद्यार्थिनीने २७ चा पाढा इयत्ता पहिलीच्या मुलांनी ५४ चा पाढा असे जवळपास ३० पर्यंतचे पाढे विद्यार्थ्यांनी न अडखळता म्हणून दाखवले. सामान्यज्ञानावर आधारित राज्यघटनेतील कलमांची २५७ पर्यंत कलमे इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्याने बोलून दाखवली.पहाल तेथे शैक्षणिक साहित्यहिवाळी या इयत्ता ४ थी पर्यंतच्या शाळेचे सर्वात महत्वाचे वैशिष्टे म्हणजे पायरी पासून ते फळ्यापर्यंत नजर जाईल तेथे शैक्षणिक व संदर्भ साहित्याचे दर्शन होत असते. मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे सर्व उपक्र म या शाळेत राबवले जातात. अ‍ॅबेकस सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचे धडे हिवाळीच्या आदिवासी मुलांना दिले जात असून स्पर्धा परीक्षांचे आवाहन पेलण्याचे सामर्थ्य या मुलांमध्ये तयार करण्याचे काम शिक्षकांकडून केले जात आहे. गीव्ह फांउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मुलांना सायंकाळच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लेकीचे घर हा अभिनव उपक्र मगावात प्रवेश करताच आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी पारंपारिक साधने व आदिवासी वाद्य संस्कृतीने सजवलेली बांबू व लाकडापासून तयार केलेली कमान आपले स्वागत करते. ओळीत असलेल्या प्रत्येक घरावर मुलीच्या नावाची पाटी लावलेली. घराच्या व सार्वजनिक भिंतीवर पाणी व स्वच्छतेचे संदेश रंगवण्यात आले आहेत. प्रत्येक संदेशाला अनुसरून शाळेतील मुले सादरीकरण करत असतात.येथील जिल्हा परिषदेची शाळा ३६५ दिवस चालते. तीन वर्षापासूनच्या मुलांना १२ तास शाळेत केशव गावित व सहकारी शिक्षक बाबासाहेब उशिर अध्यापनाचे काम करतात. या शाळेला जिल्हा भरातून शिक्षक भेटी देत उपक्र म जाणून घेतात.म्हणून ह्या विध्यार्थ्यांना भेट देण्यासाठी नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकरी अधिकारी एस भुवनेश्वरी व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी भेट देत शाळेचे उपक्र म जाणून घेतले.शाळेच्या आवारात असलेले हँगिंग गार्डन त्यामध्ये लावलेली छोटी छोटी रोपं शाळेत लावलेले तरंगचित्रे, रंगविलेल्या आकर्षक भिंती, शैक्षणिक साहित्याचा महापूर या सर्व गोष्टींची ओळख करून घेतली. शाळेचा वर्गखोल्यामध्ये तयार केलेलं राज्यमार्ग,राष्ट्रीय महामार्गावरून विद्यार्थी महामार्गाचे नाव राज्य व राजधान्या यांची माहिती आहे.शाळेतील मुल पेंटर, फिटर, टीचर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर आदी कामे मुलं स्वत: करतात, याचे कौतुक उपस्थितांनी केले. त्यानंतर पाहुण्यांसमोर लोकनृत्याचा आविष्कार सादर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर, त्र्यंबकेश्वरचे गटविकास अधिकारी मुरकुटे, गटशिक्षणाधिकारी शिरसाठ, शिक्षण विस्ताराधिकारी आर. आर. बोडके, विषय सहाय्यक उर्मिला उशीर आदी उपस्थित होते.प्रतिक्रि या ....तालुका मुख्यालयापासून जवळपास ६० किमी अंतरावर असलेली हिवाळी शाळा शैक्षणिक रोल मॉडेल आहे. हिवाळीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्भयता, हुशारी, चिकाटी अनुभवली. अशा शाळा निर्मितीसाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहोत.- एस .भुवनेश्वरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी