शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण उपक्र म चालू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:31 IST

जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्देया उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे.

जोरण : देशात सध्या कोरोना महामारीने थैमान घातला असून सगळीकडेच शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने शाळा बंद शिक्षण चालू हा अभिनव उपक्र म सुरू केला असून बागलाण तालुक्यातील डांगसौंदाणे सारख्या दुर्गम भागामध्येसुद्धा या उपक्र मास उत्तम प्रतिसाद मिळत आहे.या केंद्रामध्ये अँड्रॉइड मोबाईलधारक पालकांची संख्या नगण्य असून सुद्धा व्हॉटसअप, दिक्षा अ‍ॅप, टेलीग्राम, झूम मिटिंग, गुगल मीट, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तसेच यूट्यूबच्या माध्यमातून आॅनलाईन शिक्षण चालू आहे. ज्या पालकांकडे साधे फोन आहेत अश्यांच्या विद्यार्थ्यांना मेसेजद्वारे किंवा फोन कॉल करून अभ्यास देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक शाळेतील सर्वच शिक्षक आठवड्यातून किमान दोन दिवस विद्यार्थ्यांच्या घरी जावून अभ्यास देणे हे कार्य करीत आहे.या केंद्रातील बरेच शिक्षक ई-साहित्य निर्मिती करत असून काहीजण यूट्यूबवर आपले व्हिडिओ बनवत आहेत. तर काहीजण पीडीएफ स्वरूपात अभ्यास निर्मिती करत आहेत. प्रत्येक शाळेतील मुख्याध्यापकांनी या संदर्भात नियोजन केले असून कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहेत.आॅनलाईन असो किंवा आॅफलाईन असो शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजे हाच या उपक्र माचा उद्देश आहे. बागलाण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे हे यासंदर्भात शिक्षकांना वारंवार मार्गदर्शन करीत असून नुकतेच त्यांनी तालुक्यातील जवळपास एक हजार शिक्षकांसाठी आॅनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.यासंदर्भात डांगसौंदाणे बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार व केंद्रप्रमुख हिरालाल बधान हे शिक्षकांना मार्गदर्शन करत या उपक्रमाचा आढावा घेत आहेत. एकंदरीत डांगसौंदाणे केंद्रात शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळत आहे. 

टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळा