शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या स्वागतासाठी सजल्या शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 00:06 IST

नाशिक : शिक्षण विभागातर्फे सोमवारी (दि. १७) शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, शाळा व्यावस्थापन समिती ...

नाशिक : शिक्षण विभागातर्फे सोमवारी (दि. १७) शाळा प्रवेश दिंडीचे आयोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, शाळा व्यावस्थापन समिती सदस्य बैठक, पालक शिक्षक समिती बैठक, नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तके व मोफत गणवेश खरेदी केल्याबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे १७ ते २५ जून या कालावधीत शाळा प्रवेशाकरिता पटनोंदणी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. तर २६ जूनला शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी २६ ते २९ जून दरम्यान महापालिका क्षेत्रातील शालेय परिसरात गृहभेटीचे नियोजन करून १ जुलैला शिक्षण विभागाला माहिती सादर करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत.नाशिक : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ६ ते १४ वयोगटातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी १७ ते ३० जून या कालावधीत पटनोंदणी पंधरवडा व शाळा प्रवेशोत्सव राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात महापालिका क्षेत्रातील सर्व केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्याची माहिती शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांनी दिली आहे.शिक्षण विभागातर्फे २०१९-२० पासून महत्त्वाकांक्षी समग्र शिक्षा अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत १७ ते ३० जून या कालावधीत मनपा क्षेत्रातील ४ ते १४ वयोगटातील सर्वच मुलांना शाळेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. या अभियानात १४ जून रोजी मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची कार्यशाळा झाली असून १५ जूनला केंद्र स्तरावर सर्व खातेप्रमुख व अधिकारी यांना शाळा वाटप करून संपर्क अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे मनपास्तरावर संपर्क अधिकाऱ्यांच्या अभियानादरम्यान शाळांना भेटीचे नियोजन, स्थानिक माध्यमांतून माहिती प्रसारण, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सभांचे आयोजन करून १५ ते १७ जून या कालावधीत शालेय परिसरात दवंडी देण्याचे नियोजन करण्यात आले असून १६ जूनला शालेय परिसरात शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, अंगणवाडी सेविका व मदतनीस सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांनी पटनोंदणीसाठी फेरीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा