नांदूरशिंगोटेत घरकुल मार्ट
नांदूरशिंगोटे : महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत येथे महिला बचतगटांच्या ‘घरकुल मार्ट’चा शुभारंभ करण्यात आला. घरकुल उभारणीसाठी लागणारे साहित्य महिला बचतगटाच्या या मार्टमार्फत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
वाढत्या महागाईने जनता होरपळली
नांदूरशिंगोटे : ग्रामीण भागातील गोरगरीब जनता गेले दीड वर्ष कोरोना संकटात सापडली असतानाच, जगण्यासाठी जीवनावश्यक असलेल्या सर्वच वस्तूंची दरवाढ झाल्यामुळे कष्टकरी जनता भरडून निघत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वारंवार पेट्रोल, डिझेल व खाद्यतेल आदींच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे
मानोरी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
नांदूरशिंगोटे : नांदूरशिंगोटे ते वावी दरम्यान असलेल्या मानोरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता अशी परिस्थिती झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी होणे गरजेचे असताना संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. या परिसरात नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात.
ग्रामीण भागात बाजारपेठ पूर्वपदावर
नांदूरशिंगोटे : येथील व परिसरात असणाऱ्या बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर आल्याने व्यापारी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. तब्बल दोन महिन्यांनंतर ब्रेक दी चेन अंतर्गत शासनाने निर्बंध शिथिल केल्याने नागरिकांसह व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी उत्साहाने दुकाने उघडली. दोन महिन्यांपासून शुकशुकाट असलेल्या बाजारपेठेत गर्दी दिसून आली.