शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा आॅगस्टमध्येच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:32 IST

लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणारच नसल्याचे दिसते आहे.

ठळक मुद्देस्पष्टीकरण : शाळा सुरू नाहीच, केवळ शिक्षणाधिकाऱ्यांचा पत्रप्रपंच

नाशिक : लॉकडाऊननंतर शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण खात्याने वेगवेगळ्या तारखा घोषित केल्या. १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणार असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र, पालक आणि शिक्षण संस्थांचा विरोध तर वाढलाच शिवाय केंद्र शासनानेदेखील आॅगस्टचा मुहूर्त दिल्याने आता १५ जून रोजी शाळेची घंटा वाजणारच नसल्याचे दिसते आहे. दरम्यान, शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी आपण केवळ माहिती संकलित करण्यासाठी शाळांना पत्र पाठविले असल्याचा दावा केला आहे. तथापि, त्यांच्याकेवळ पत्रामुळे शिक्षक-शिक्षकेतर संघटनांना निवेदने देण्यापासून आंदोलनाच्या पवित्रा घेण्यापर्यंत सारे काही नाहक करावे लागले.लॉकडाऊन काळात शाळा आणि महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यानंतर आता शासनानेच सारे काही टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात उद्योग आणि बाजारपेठा सुरू झाल्या असल्या तरी शाळा महाविद्यालये सुरू करावीत काय आणि ती कधी करावीत याविषयी शिक्षण क्षेत्रात संभ्रम आहे. त्यातच शिक्षण विभागातील राज्य स्तरावरून स्थानिक स्तरापर्यंत अधिकारी वेगवेगळे पत्र पाठवित आहेत. त्यामुळे शिक्षण खात्याची नक्की भूमिका काय? असा संभ्रम निर्माण झाला आहेत.दरम्यान, आता शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रवीण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता आपल्या पत्राचा वेगळ अर्थ काढण्यात आला. वस्तूत: ९ जूनपर्यंत शासनाला काही माहिती पाठविणे आवश्यक होते. त्यादृष्टीने हे पत्र पाठविण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे शाळा १५ जून रोजी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. परंतु, यासंदर्भात शाळा व्यवस्थापन अथवा मुख्याध्यापक यांना अधिकृत माहिती मिळाली नसल्याने अजूनही संभ्रम कायम असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा