शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत चटणी, भाकरी, ठेच्याचा महापूर; उरलेल्या भाकऱ्या, पाणी बाटल्यांचे अनाथाश्रमात दान
2
"मी जर टॅरिफ लावला नसता, तर भारताने कधीच..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा टॅरिफची 'वकिली'
3
"आरक्षणाचा तिढा केंद्राच्या गळ्यात घालण्याचा धूर्त प्रयत्न हाणून पाडला"; भाजपने मानले CM फडणवीसांचे आभार
4
चीनची बाजी, परंतु भारतच खरा 'किंग'; 'या' दिग्गजाला आपल्यावर इतका का भरवसा?
5
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
6
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना कोणी सांगितले? काय लाभ झाला?
7
झोमॅटोचा झटका! सणासुदीत प्लॅटफॉर्म फीमध्ये २०% वाढ; आता प्रत्येक ऑर्डरवर इतके रुपये मोजावे लागणार
8
नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?
9
नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."
10
वामन जयंती २०२५: बलिराजाच्या उद्धारासाठी महाविष्णूंचा अवतार, तीन पावलांत ब्रह्मांड व्यापले
11
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
12
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
13
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
14
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
15
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
16
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
17
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
18
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
19
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
20
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल

शालेय प्रशासनाच्या घोळामुळे रखडली शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रिया

By admin | Updated: April 5, 2017 01:07 IST

संथ कार्यपद्धती : शिक्षण विभागावर तीन वेळा मुदतवाढ देण्याची नामुष्की; प्रवेश अद्यापही शिल्लक; शाळांकडून अपूर्ण माहिती

नामदेव भोर :  नाशिक शिक्षण हक्क प्रवेशासाठी केलेल्या आॅनलाइन अर्जांची पहिली सोडत काढण्यात प्रवेशाची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश घेण्याची मुदत दिली असताना ही प्रक्रिया तब्बल १० दिवस उशिरापर्यंत म्हणजेच २४ मार्चपर्यंत सुरू होती. या काळात शालेय प्रशासनाच्या आडमुठेपणामुळेच शिक्षण विभागाला अडखळतच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागली. शिक्षण विभागाच्या २५ टक्के प्रवेश योजनेअंतर्गत पहिल्या फेरीत सोडतीनंतर प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना १५ मार्चपर्यंत संबंधित शाळांमध्ये प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती. तर मुख्याध्यापकांना ही प्रक्रिया पूर्ण करून उर्वरित विद्यार्थ्यांची संख्या शून्य करण्यासाठी १८ मार्चची मुदत देण्यात आली होती. म्हणजे १८ तारखेनंतर तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांखेरीज अन्य आकडेवारीत बदल होणे अपेक्षित नसताना केवळ मुख्याध्यापकांनी आॅनलाइन माहिती सादर करण्यास दिरंगाई केल्याने ही प्रक्रिया तब्बल १० दिवस रखडली असून, या कालावधीत शाळेत संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येतही मोठी तफावत आढळून आली आहे. शिक्षणहक्क प्रवेशाच्या पहिली फेरीविषयी साशंकताच निर्माण झाली आहे. मुख्याध्यापकांनी १८ मार्चपर्यंत संकेतस्थळावर सादर केलेल्या माहितीनुसार १८ मार्चपर्यंत शाळेत संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ २२८, त्यानंतर या संख्येत सातत्याने वाढ होत गेल्याचे दिसून येत असून, २० मार्चला ही संख्या तब्बल ६२० पर्यंत पोहोचली तर २१ मार्चला हा आकडा ७६० पर्यंत पोहोचला. २३ मार्चला ८५१ आणि अखेरच्या दिवशी प्रवेशासाठी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा ८५१ वरून ८४९ झाली. मुदत संपल्यानंतर संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत होणारा हा बदल संभ्रम निर्माण करणारा असल्याचे समोर आले आहे. मुख्याध्यापकांना तीन वेळा मुदत वाढवून देण्यात आली. या मुदतीत विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करून प्रविष्ठ विद्यार्थीसंख्या व प्रवेश नाकारण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या बदलणे अपेक्षित होते. परंतु या १८ ते २४ मार्च या कालावधीत मुख्याध्यापकांनी तब्बल ६२१ विद्यार्थ्यांचा समावेश संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रकान्यात टाकून शिक्षण हक्क प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली. या प्रकारामुळे संपूर्ण आॅनलाइन प्रक्रियेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)