शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती प्रश्नी आंदोलन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 00:57 IST

दुष्काळी परिस्थितीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून चालढकल व आडकाठी केली जात असून, या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : दुष्काळी परिस्थितीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून चालढकल व आडकाठी केली जात असून, या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने कॉँग्रेस पक्षाच्या अनुसूचित विभागाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.कॉँग्रेसच्या नाशिक जिल्हा अनुसूचित विभागाची बैठक शहराध्यक्ष शरद आहेर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज वाटपाबाबत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या अडचणींचा पाढा पदाधिकाऱ्यांसमोर मांडला. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी, सध्याचे शासन हे मागासवर्गीयांच्या बाबतीत अतिशय कठोर भूमिका स्वीकारत असून, त्यामुळे मागासवर्गीयांची कोंडी होत आहे. गेल्या पाच वर्षांत शिष्यवृत्ती देण्यात अडचणी व आडकाठी आणली जात असून, याबाबत जनतेमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. आगामी काळात नाशिक जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करून आंदोलन करण्याचा इशारा दिला. या बैठकीस डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, मनोहर आहिरे, अशोक शेंडगे, मिलिंद हांडोरे, उद्धव पवार, केदा गायकवाड, विजय अंभोरे, संजय जगताप आदी उपस्थित होते.अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना शरद आहेर यांनी, काँग्रेस पक्ष हा नेहमी अनुसूचित जाती जमातीच्या न्यायाच्या बाजूने उभा राहिलेला पक्ष आहे. या पक्षाने नेहमीच तळागाळातील गोरगरीब जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय योजना राबविल्या आहेत. परंतु सध्याचे भाजप-सेनेचे शासन हे मात्र याविरुद्ध पावले उचलून एकप्रकारचा असंतोष जनतेमध्ये पोहोचणेकामी प्रयत्नशील असल्याचे दिसते. म्हणून अनुसूचित जाती विभागाच्या वतीने वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थींच्या वतीने तसेच अर्जदारांच्या वतीने तातडीने संबंधित विभागाला निवेदन देऊन अंमलबजावणी करणेकामी भाग पाडले पाहिजे.

टॅग्स :congressकाँग्रेसScholarshipशिष्यवृत्ती