शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्यानिमित्त फुलबाजारात दरवळला सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:29 IST

गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून, दसºयाच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे.

नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारले आहेत. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणी वाढली असून, दसºयाच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ झाल्याने झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १५० ते १६० रुपये जाळीने विकला जात आहे.  नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फुलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. दसºयाच्या दिवशी तर घरातील देवदेवतांसह शस्त्रपूजन व वाहने आणि गृहसजावटीसाठीही फुलांचा वापर होत असल्याने फुलांना मागणी वाढली आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खºया फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी रंग भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फुलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात फुलांच्या खरेदीसाठी झुंबड उडाल्याचे दिसून येत आहे.नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी दुष्काळाच्या झळा बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीagricultureशेती