नाशिक : सरकारने अचानक हजार व पाचशे रुपयांच्या मोठ्या जुन्या चलनी नोटा रद्द केल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नवीन मोठ्या नोटांपेक्षा १०, २०, ५०, १००च्या नोटांविषयी विश्वासार्हता वाढली असून, या नोटांना मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपवाद वगळता १०, २०, ५०, १०० च्या नोटांचा भरणा होत नसल्याचे चित्र असल्याने बँकांमध्येही १०, २०, ५०, १०० च्या चलनी नोटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. बँकामध्ये येणारे चलन जलदगतीने संपत असून पर्याप्त स्वरूपात नवीन चलनी नोटांचा पुरवठा वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे. गेल्या सहा दिवसांपासून नागरिक १00 व ५0 च्या नोटा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शंभराच्या नोटांचा तुटवडा कायम
By admin | Updated: November 16, 2016 22:47 IST