शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

घोटाळेबाजांनी संस्कृती शिकवू नये!

By admin | Updated: September 26, 2015 22:25 IST

‘सनातन’चा पलटवार : कत्तल घडवणाऱ्या कॉँग्रेसवरच बंदी आणा

नाशिक : ज्यांनी ‘आदर्श’ शब्दच बदनाम केला, अशा घोटाळेबाजांनी संस्कृतीच्या गप्पा मारू नये, आधी आपल्या पक्षाच्या कृष्णकृत्यांचा आढावा घ्यावा, अशा शब्दांत सनातन संस्थेने कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आज पलटवार केला. ‘सनातन’वर बंदीची मागणी करणारे चव्हाण, राधाकृष्ण विखे, जितेंद्र आव्हाड हे धर्मद्वेष्टे नेते असून, १९८४ मध्ये केलेल्या ५० हजार शिखांच्या कत्तलीला जबाबदार धरून कॉँग्रेसवरच बंदी आणायला हवी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी समीर गायकवाड या ‘सनातन’च्या साधकाला अटक केली असून, या पार्श्वभूमीवर ‘सनातन’वर बंदी आणण्याची मागणी होत आहे. अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी अशी जाहीर मागणी केली होती. ‘सनातन’ने पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिले व समीर गायकवाड हा निर्दोष असून, लवकरच त्याची मुक्तता होईल, असा दावाही केला. ‘सनातन’चे प्रसारसेवक नंदकुमार जाधव यांनी सदर बंदीची मागणी सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केली जात असल्याचे सांगत ‘सनातन’चे धर्मजागृतीचे कार्य वाढत चालल्याने अनेकांना पोटशूळ उठून वारंवार आरोप केले जात असल्याची टीका केली. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय संघटक डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले, समीरचे मोबाइल दुरुस्तीचे दुकान असल्याने त्याच्याकडे २३ मोबाइल आढळून आले. त्यावरून तो दोषी ठरत नाही. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन निकालाची वाटही न पाहता ‘सनातन’वर बंदीची मागणी करणे म्हणजे देशाच्या घटनेवर, न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्यासारखेच आहे. त्यामुळे अशी मागणी करणाऱ्यांचे लोकप्रतिनिधित्व रद्द करावे. अशा मागण्यांमुळे तपास यंत्रणांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही डॉ. पिंगळे यांनी केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत कॉँग्रेसने ब्रिटिशांशी तह करून देशाचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणाले. यावेळी हिंदू जनजागृतीचे समितीचे राज्य संघटक सुनील घनवट उपस्थित होते. (प्रतिनिधी)