शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

उद्यान विभागात पुन्हा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:42 IST

माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे.

ठळक मुद्देमहासभेत चौकशीचे आदेश २८० बगिच्यांची खासगीकरणातून देखभालीस मंजुरी

नाशिक : माजी उद्यान अधीक्षकांच्या काळातील बारा कोटींचा उद्यान घोटाळा मार्गी लागत नाही तोच सध्याच्या कारकिर्दीतही मजूर सोसायट्यांना मर्यादेपेक्षा अधिक रकमेची कामे दिल्याचा घोटाळा उघड झाला आहे. उद्यान विकासाच्या दोन कामाची निविदा काढताना ५० लाख रुपयांची नोंदणी असणाऱ्या ठेकेदार मजूर सोसायटीत ५३ लाख रुपये, तर १५ लाखांची नोंदणी करणाºया मजूर सोसायटीस १८ लाखाचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी शुक्रवारी (दि.१९) महासभेत केला. विशेष म्हणजे मंजूर नोंदणी क्षमतेपेक्षा अधिक रकमेचे काम देता येत नसल्याचे प्रशासनाने मान्य केल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याप्रकरणाची अतिरिक्त आयुक्तांकडुन चौकशी करण्याचे तसेच यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. महापौर रंजना भानसी यांनी या प्रकरणाची चौकशी अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.दरम्यान, या महासभेत शहरातील २८० उद्याने प्रभागनिहाय निविदा ३१ एजन्सींना दोन वर्षांसाठी देखभालीसाठी देण्याच्या कामाचे प्राकलन ८ कोटी ४२ लाख ७२ हजार रुपयांचे प्राकलन मंजूर करण्यात आले.उद्यान विभागात सुरू असलेला गैरव्यवहार बडगुजर यांनी उघड केला. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे यांनी निविदेत अशाप्रकारे अटी असल्याने मर्यादेपेक्षा जास्त कामे देता येत नसल्याचे स्पष्ट केले. या चर्चेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी या प्रकाराला जबाबदार कोण आणि संबंधितांवर काय कारवाई होणार याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावर आयुक्तांनी यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले.स्मार्ट सिटीच्या वादावर विशेष महासभास्मार्ट सिटी कंपनीतील अधिकाऱ्यांची मनमानी आणि संशयास्पद व्यवहार यावर कॉँग्रेस नगरसेवक शाहू खैरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर अल्पशी चर्चा झाली कंपनीच्या कारभारावर विशेष महासभा बोलविण्यात येईल, असे महापौर रंजना भानसी यांनी घोषित केले कंपनीचा कारभार दोन चार डोकी चालवत असल्याचा आरोप यावेळी गजानन शेलार यांनी केला, तर सभागृह नेता सतीश सोनवणे यांनीदेखील आरोपात तथ्य असल्याचे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorruptionभ्रष्टाचार