शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचे दणाणले धाबे

By admin | Updated: March 23, 2017 00:04 IST

सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत.

सटाणा : येथील नगरपालिका प्रशासनाने विविध कर थकबाकीदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मालमत्ता सील केल्यानंतर थकबाकीदारांच्या नावाच्या यादीचे होर्डिंग्ज विविध चौकांत लावण्यात आले आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीस चांगला प्रतिसाद मिळत असून, शासनाने याबाबत सक्तीने कार्यवाही चालू ठेवून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले असून, रांगा लावून थकबाकी भरण्यासाठी मालमत्ता-धारकांनी अक्षरश: गर्दी केली आहे.शहरात घरपट्टी, पाणीपट्टी व व्यापारी संकुल तसेच प्लॉटधारकांकडे विविध प्रकारच्या करांची थकबाकी आहे. वसुलीसाठी पालिका प्रशासनातर्फेवारंवार तगादा लावूनही थकबाकीदार दादच देत नसल्याचा वर्षानुवर्षांचा पूर्वानुभव आहे. त्यामुळे शासननिर्देशानुसार करवसुलीसाठी पालिकेने यावर्षी अधिक सक्तीने कार्यवाही करण्याची मोहीम हाती घेतली आहे. पालिका मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी अधिकारी व कर्मचारीवर्गासह प्रसंगी पोलीस बंदोबस्त सोबत घेऊन धडक वसुली सुरू केली आहे. प्रारंभी नोटिसा बजावून नळजोडणी कट करण्यात आली. त्यानंतर मालमत्ता सील करण्यात आल्या आणि अखेर थकबाकीदारांच्या नावांचे होर्डिंग शहरभर चौकाचौकांत लावण्यात आले. पालिकेने अचानक व अनपेक्षितपणे उचलल्या पावलामुळे थकबाकीदार फलकावर नावे आल्यानंतर करवसुलीस चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. थकबाकी वसुलीत कसूर न करता अधिकाधिक प्रभावीपणे कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाकडून आता थकबाकीदारांच्या घरांसमोर ढोलताशे वाजविण्याचा इशारा देण्यात आला असून, ३१ मार्चअखेरपर्यंत  थकबाकी भरणा न केल्यास कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)