शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पाच्या आगमनासाठी नाशिकला सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 18:13 IST

थर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल

ठळक मुद्देथर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल

नाशिक : गणेशोत्सवाची जोरदार तयारी सध्या शहरात सुरू आहे. मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तर बाप्पांच्या स्वागतासाठी विविध सजावटींच्या वस्तू आणि पूजेच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. गणेशोत्सव निर्विघ्नपणे, उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे.गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने दररोज लाखोंची उलाढाल सुरू आहे. महागाई आणि मंदीचे सावट गणेशोत्सवावर आहेच; पण तरीही लाडक्या गणरायाच्या स्वागतात कोणतीही कमी राहू नये यासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आरास सजावटीला लागणारी चमकी, माळा, सजावटीचे साहित्य, आकर्षक मखरी दाखल झाल्या आहेत. साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. शहरातील मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, सराफ बाजार यांसह उपनगरात सर्वत्र सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. संपूर्ण परिसर आकर्षक चमकी व मखरींनी व्यापलेला आहे. बाजारात विविध प्रकारांमध्ये मखरी उपलब्ध असून, गणेशोत्सव काळात मखरींना मागणी वाढली आहे.यंदा थर्माकोल मखरांना बंदी असल्याने पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी मखरी बाजारात दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून घरगुती गणेशोत्सवासाठी मखरींना मागणी वाढली आहे. या पर्यावरणस्नेही मखर फोल्डेबल असल्याने त्यांचा दीर्घकाळ वापर करता येणार आहे. याशिवाय मोत्यांचे, कापडी तोरण, वॉल हॅगिंग, कृत्रिम फुले यांचीही ग्राहक आवडीने खरेदी करीत आहेत. यंदा गणपती पाठोपाठ लगेचच गौरींचेही आगमन होत असल्याने गौरीच्या साजशृंगाराच्या साहित्याचीही बाजारात रेलचेल आहे. गौरीच्या रेडिमेड साड्या, दागिने, गजरे, वेण्या, खण, मुखवटे आदींनी बाजारपेठ गजबजून गेली आहे. असंख्य पर्याय उपलब्ध होत असल्याने काय घ्यावे आणि काय नको असे महिलांना होत आहे. गौरी गणपतीच्या आराससाठी लायटिंगच्या माळा, फोकस लाइट यांच्या खरेदीवरही भर दिला जात आहे.

 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव