शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांची जन्म भूमी भगूर गावच्या उद्यानरूपी स्मारकाला अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 19:04 IST

भगूर पुत्र स्वातंत्रवीर सावरकरचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात.

ठळक मुद्दे शासनाच्या नावाने कारभा-यांनी केले हात वर हे उद्यान १९७७-७८ मध्ये साकारण्यात आले

विलास भालेराव, भगुर - सशस्त्रक्रांतीचे पुरस्कर्ते आणि जाज्वल्य देशाभिमान असणा-या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे उद्यानरूपी स्मारक साकारल्यानंतर भगूरकरांना झालेला आनंद क्षणैक ठरला. कालांतराने गावालगत दारणाकाठी असलेल्या या स्मारकाला अवकळा आली असून भिकाºयांचे ते आश्रयस्थान बनले आहेत. सावकरकरांचे नाव घेऊन कारभार करणाºया सर्वच पक्षांच्या नेत्यांना त्याचे विस्मरण होत असून राज्य सरकारकडून निधी आल्यानंतरच स्मारकाचे काम मार्गी लागेल असे सांगून कारभारी हात वर करीत आहेत.भगूर पुत्र स्वातंत्रवीर सावरकरचा आत्मसमर्पण दिन सोमवारी (दि.२६) असून त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे भगूरकर उद्यानाच्या अवस्थेमुळे अस्वस्थ होतात. भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वाडा असून त्या जवळ दारणानदीकाठी निसर्गरम्य असे हे उद्यान १९७७-७८ मध्ये साकारण्यात आले होते. त्यावेळी पां. भा. करंजकर हे नगराध्यक्ष होते. नाशिक नगरपालिकेतील अधिकारी विशेषत: मधूकर झेंडे यांच्या सारख्या अधिका-याची मदत घेऊन उद्यानात आकर्षक झाडे लावण्यात आली होती. त्याच प्रमाणे ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते या उद्यानाचे उदघाटन करण्यात आले होते. त्याकाळी भगुरकरच नव्हे तर अनेकांना या उद्यानाच्या आठवणी स्मरतात. परंतु कालांतरांने या उद्यानाकडे दुर्लक्ष होत गेले आणि ते लयास जाऊ लागले. त्यासाठी मध्यंतरी नवीन आराखडा तयार करण्यात आला. परंतु खर्चाचे नियोजन नसल्याने उद्यानाचे नुतनीकरण पूर्ण होऊ शकले नाही. दरवेळी भगूर नगरपालिकेच्या निवडणूका आल्यानंतर या उद्यानाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि निवडणूकांचे निकाल लागल्यानंतर हा मुद्दा विस्मरणात जातो. वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या निवडणूकीच्यावेळी देखील स्थानिक नेत्यांनी सत्ता आल्यास सहा महिन्यात उद्यानाचे काम सुरू झालेले दिसेल असा शब्द दिला होता. मात्र, वर्ष उलटले तरी हालचाल नाही, उलट राज्यसरकारकडून निधी आली की काम सुरू होईल असे सांगून हातवर केले जात आहे.उद्यानाची सद्यस्थिती गंभीर असून या जागेत अनेक भिकारी शौचालयात राहत आहे. उद्यानात शोभीवंत झाडांऐवजी गाजर गवत उगवले आहेत. अत्यंत अस्वच्छ असा हा परिसर असून एकेकाळी वर्दळ असलेल्या या उद्यानाकडे जाण्यासही भगूरकर धजावत नाहीत. ही स्थिती बदलावी अशी मागणी नागरीक करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकShiv SenaशिवसेनाMuncipal Corporationनगर पालिका