शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

केरळ  पूरग्रस्तांसाठी सव्वालाखाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:24 IST

सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.

मालेगाव : सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती मामकोचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ज्येष्ठ नेते राजेंद्र भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.  केरळात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या संकटामुळे सर्वसामान्य माणूस कोलमडून पडला आहे. देशभरातून खाद्यपदार्थ, वैद्यकीय सेवा व इतर सुविधा पुरविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मामको बँकेच्या संचालकांची तातडीची बैठक सोमवारी बोलविण्यात आली होती. या बैठकीत मामको बँकेतर्फे एक लाख तर मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे २५ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.  यापूर्वीदेखील बँकेने सामाजिक बांधिलकी जोपासत शेतकरी आत्महत्या, उत्तरखंड पूर, मालेगाव बॉम्बस्फोट आदी घटनांमध्ये आर्थिक मदत केली आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत सप्तशृंगीगडावर जाणाऱ्या ६५ हजार भाविकांना मामको जनकल्याण ट्रस्टतर्फे वैद्यकीय सेवा पुरविण्यात आली. वैकुंठरथदेखील उपलब्ध असतो. बँक केवळ कर्जावरील व्याज व ठेवी गोळा न करता माणुसकीच्या नात्याने प्रत्येक संकटात मदत करीत असते. राष्टÑीय संकट निवारण्यासाठी बँक अग्रेसर आहे.  जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. सदरचा धनादेश केरळच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करून पूरग्रस्तांना त्यातील निधीचे वाटप केले जाणार असल्याची माहिती चेअरमन सोनवणे, भोसले यांनी यावेळी दिली.पत्रकार परिषदेला बँकेचे संस्थापक हरिलालशेठ अस्मर, व्हाइस चेअरमन मंगला भावसार, संचालक संजय दुसाने, सतीश कलंत्री, चंदू बच्छाव, विठ्ठल बागुल, मामको जनकल्याण ट्रस्टचे अध्यक्ष भिका कोतकर आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूर