शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेवाव्रती कैवल्य पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:20 IST

कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे

नाशिक : कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सेवाकार्य करणे महत्त्वाचे असते. कैवल्य पुरस्कार देऊन अशा कार्यकर्त्यांचा सत्कार शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेने केला आहे. चांगल्या गुणांची जोपासना करणे गरजेचे आहे आणि अशाच सेवकार्यातून मोठमोठी कार्ये उभी राहतात, असे प्रतिपादन भाजपाचे राज्य पुनर्वसन प्राधिकरण स्वनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केले.शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात सेवाव्रती कैवल्य पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी भंडारी म्हणाले की, समाजातील सेवाभावी संस्था सामाजाच्या कल्याणासाठी नेहमीच कार्य करतात यामध्ये त्या संस्थांमधील कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग असतो़ प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब सानप, भाजप प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, डॉ. विकास गोगटे, शंतनू गुणे उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते विजय साने, श्रीकांत गायधनी, संस्था अध्यक्ष सतीश शुक्ल, कार्याध्यक्ष तुषार जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे ,भानुदास शौचे, मालती कुरुं भट्टी आदींसह मान्यवर उपस्थित होते.संस्था कार्याध्यक्ष तुषार जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. दीपप्रज्वलन व महर्षी याज्ञवल्क्य प्रतिमापूजनाने कार्यक्र माची सुरु वात झाली. यावेळी पं. रवींद्र देव, पं. वैभव दीक्षित, पं. उपेंद्र देव यांनी मंत्रघोष केला. यावेळी विनिता कुलकर्णी, विद्या खांदवे, मोहिनी भगरे, उदय जोशी, राजन कुलकर्णी, अनिल देशपांडे, दिलीप शुक्ल, प्रतीक शुक्ल, लीना चांदवडकर आदी उपस्थित होते. सन्मानपत्राचे वाचन पं. वैभव दीक्षित यांनी केले. सूत्रसंचालन कीर्ती शुक्ल यांनी केले. धनंजय पुजारी यांनी आभार मानले.विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणमाधव भंडारी यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी माधवराव भणगे, चंद्रकांत महाजन, राजश्री शौचे यांना कैवल्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मानचित्र, स्मृतिचिन्ह, पुणेरी पगडी, सन्माननिधी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप आहे. आबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या देणगीतून या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. या कार्यक्र मातच गुणवंत विद्यार्थी गौरवातील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक