शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

नासाका कारखानारोड येथे सव्वादोन लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:15 IST

पळसे नासाका कारखानारोडवर बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला.

नाशिकरोड : पळसे नासाका कारखानारोडवर बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण सव्वादोन लाखांचा ऐवज चोरून नेला.नासाका कारखानारोड येथे राहणारे विजय गदाधर पाणीग्रही हे गेल्या शुक्र वारी (दि.१७) मुंबई येथे कुटुंबासह घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते. रविवारी (दि. १९) शेजारी राहणारे अनिल घुगे यांनी पाणीग्रही यांना फोन करून सांगितले की, तुमच्या घराचा पुढील दरवाजा उघडा आहे. त्यानंतर लागलीच नाशिकरोड पोलिसांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याच्या कडीकोंडा तोडून घरातील कपाटातील व सुटकेसमध्ये ठेवलेले १ लाख २८ हजार रु पयांची रोकड, सोन्याचे लॉकेट, चार अंगठ्या, कानातले पेंडल, सोन्याची साखळी, असा साडेतीन तोळे वजनाचा ८५ हजार रु पये किमतीचे दागिने असा एकूण २ लाख १३ हजार रु पयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रवाशांचे मोबाइल चोरणाऱ्यास अटकनाशिकरोड रेल्वेस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाइल चोरणाºया चोरट्यास रेल्वे पोलिसांनी पकडून त्याच्याकडून पंधरा हजार रुपये किमतीचा चोरलेला मोबाइल जप्त केला आहे. पोलिसांनी संशयित समीर अहमद अन्सारी (रा. मालेगाव) यास पकडून त्याची कसून चौकशी केली असता त्याने गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात रेल्वे प्रवासाचा मोबाइल चोरून विकला असल्याची माहिती दिली. रेल्वे प्रवासी विजय पाटील यांचा चोरीस गेलेला चोरीस गेलेला मोबाइल जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी