शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘एमबीए’साठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:16 IST

मास्टर आॅफ बिझनिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. त्यामुळे एमबीए करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी आता तीन प्रवेश परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नाशिक : मास्टर आॅफ बिझनिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. त्यामुळे एमबीए करू इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी आता तीन प्रवेश परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील दोन परीक्षा पार पडल्या असून आता विद्यार्थ्यांना डीटीईतर्फे घेतली जाणारी सीईटी परीक्षा १० व ११ मार्च रोजी परीक्षा देता येणार आहे. एमबीए प्रवेश परीक्षेला प्रविष्ट होण्याची ही शेवटची संधी असणार आहे.  एमबीए प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा देणे बंधनकारक आहे. एमबीएसाठी सी-मॅट, तंत्रशिक्षण विभागातर्फे डीटीई एमबीए सीईटी आणि कॅट या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना यापैकी कोणतीही एक सीईटी परीक्षा दिल्यानंतर त्यानुसार प्रवेश मिळू शकणार आहे. या तीन परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यातील पहिली सीईटी परीक्षा येत्या २० जानेवारीला घेण्यात आली. कॅट, सीमॅट व महाराष्ट्र डीटीई एमबीए एमएमएस सीईटी या तिन्ही परीक्षांपैकी कॅट व सीमॅट या परीक्षा झाल्या आहेत, तर डीटीईतर्फे घेण्यात येणारी सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज केले आहे. येत्या १० व ११ मार्च रोजी ही प्रवेश परीक्षा होईल.शहरात तेराशे जागाशहरातील एमबीए महाविद्यालयात एमबीए प्रवेशप्रक्रि या, प्रवेशपरीक्षा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एमबीए अभ्यासक्र मांची नाशिकसह विभागात ४९ महाविद्यालये असून, त्यात २७०० हून अधिक जागा उपलब्ध आहे, तर नाशिक शहरात २५ महाविद्यालये असून त्यात १३०० हून अधिक जागा उपलब्ध आहेत.

टॅग्स :examपरीक्षा