नगराध्यक्ष : दोन्ही ठिकाणी एकमेव अर्ज दाखल झाल्याने महिलाराजपेठला सातपुते तर सुरगाण्यात लहरे नाशिक : पेठ नगरपंचायतीच्या इतिहासात पहिली महिला नगराध्यक्ष होण्याचा मान शिवसेनेच्या लता सातपुते यांना मिळण्यास काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असून, येत्या ३ तारखेला नगराध्यक्षाची अधिकृत घोषणा होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे़, तर सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या नगरसेवक रंजना सुरेश लहरे यांची बिनविरोध निवड झाली. पेठ नगरपंचायतीत एकूण १७ नगरसेवक असून, सेनेकडे आठ व एक अपक्ष असे नऊ नगरसेवक आहेत़ तर पेठ शहर विकास आघाडीचे राष्ट्रवादी, माकपा, भाजपा व अन्य असे आठ नगरसेवक आहेत. मंगळवारी नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेच्या लता सातपुते यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे़ पेठला हा महत्त्वाचा निर्णय घेताना जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित, भाजपाचे तालुकाध्यक्ष रामदास भोये, कांतीलाल राऊत, बाजार समितीचे संचालक श्यामराव गावित, विद्यार्थी सेनाप्रमुख मोहन कामडी, तुळशिराम वाघमारे, जगदीश शिरसाठ, नगरसेवक मनोज घोंगे, कुमार मोंढे, चेतन निखळ, प्रकाश धुळे, लीला निकम, सुनीता चौधरी, प्रतिभा पाटील, भाग्यश्री शिरसाठ यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष डोमे, भाजपाचे भागवत पाटील आदि उपस्थित होते़ (लोकमत चमू)
पेठला सातपुते तर सुरगाण्यात लहरे
By admin | Updated: November 24, 2015 22:21 IST