नाशिक : सातपूर परिसरातील महादेववाडी भागात रविवारी (दि.३१) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कपड्यामध्ये अर्धवटस्थितीत गुंडाळले अर्भक बेवारसपणे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर प्रकार परिसरातील एका जागरूक युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने घटना पोलिसांना कळविली. अर्भक स्त्री किंवा पुरूष आहे, याबाबत कुठलाही अभिप्राय वैद्यकिय अधिकाºयांकडून प्राप्त झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सातपूरला बेवारस अर्भक आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 16:18 IST