शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर प्रभाग सभापतिपद मनसेच्याच पारड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 02:06 IST

महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांना सभापतिपद मिळणार आहे.

गोकुळ सोनवणे ।सातपूर : महापालिकेच्या सातपूर विभागात भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला असला तरी अपेक्षित बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मागील वर्षी मनसेच्या पाठिंब्याने भाजपाने सातपूर प्रभागाची सत्ता ताब्यात ठेवली होती. आता भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांना सभापतिपद मिळणार आहे. पक्षीय बलाबल पाहता अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेच्या हातात यापुढील काळातदेखील सभापतिपदाचा रिमोट राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत सातपूर विभागात प्रथमच भाजपाला सर्वाधिक म्हणजेच नऊ जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेला आठ जागा मिळाल्या आहेत. तर मनसेला दोन जागांवर आणि रिपाइंला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. त्यात रिपाइंने शिवसेनेबरोबर राहण्याचा निर्णय घेतला असल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपा आणि शिवसेनेचे पक्षीय बलाबल सारखे झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन जागा मिळविलेल्या मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ज्या पक्षाला मनसेचा पाठिंबा मिळेल त्याच पक्षाचा सभापती होणार आहे. म्हणजेच सत्तेची चावी मनसेच्याच हाती राहणार आहे.  मागील वर्षी मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने माधुरी बोलकर या भाजपाच्या सातपूर विभागाच्या पहिल्या प्रभाग सभापती ठरल्या होत्या. यावर्षी साहजिकच भाजपा मनसेला पाठिंबा देऊ शकते. त्यामुळे मनसेचे योगेश शेवरे यांचा सभापतिपदाचा मार्ग सुकर मानला जात आहे. दरम्यान, स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हिप सहयोगी सदस्य मुशीर सय्यद यांना बजावला होता. त्यामुळे आता प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपाबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला तर विरोधकांच्या हाती प्रभाग समिती जाण्याची शक्यता आहे. मनसे कुणाबरोबरही राहिली तरी सभापतिपदी मनसेच्याच उमेदवाराची वर्णी लागण्याचीही चर्चा आहे.मनसेच्या हाती चावीमहानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाला ९ जागा, शिवसेनेला ८ जागा, मनसेला २ जागा आणि रिपाइंला १ जागा मिळाली आहे. त्यामुळे अवघ्या २ जागा मिळालेल्या मनसेने ठरविले त्याच पक्षाचा सभापती होऊ शकतो. मनसेने भाजपाला पाठिंबा दिल्याने आता दुसऱ्या आणि तिसºया वर्षीचे सभापतिपद मनसेला मिळण्याची शक्यता आहे किंबहुना तशा प्रकारच्या पक्षपातळीवर वाटाघाटी झाल्याचे समजते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका