शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर प्रभाग सभापतीमनसेचे शेवरे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:07 IST

सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत नसल्याने यावर्षीही शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांना माघार घ्यावी लागली. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सातपूर : सातपूर प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या पाठिंब्याने मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बहुमत नसल्याने यावर्षीही शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांना माघार घ्यावी लागली. निवडणूक प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.सातपूर विभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. २०) सकाळी साडेदहा वाजता प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. मनसेचे योगेश शेवरे, भाजपाचे रवींद्र धिवरे, तर शिवसेनेचे संतोष गायकवाड हे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला होता. या वेळेत भाजपाचे रवींद्र धिवरे आणि शिवसेनेचे संतोष गायकवाड यांनी माघार घेतली. शेवरे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी शेवरे यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड घोषित केली. या निवडणुकीत सलीम शेख, दिनकर पाटील, वर्षा भालेराव, रवींद्र धिवरे, हेमलता कांडेकर, शशिकांत जाधव, सुदाम नागरे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, अलका अहिरे, विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, राधा बेंडकोळी, भागवत आरोटे, सीमा निगळ, दीक्षा लोंढे आदी सहभागी झाले होते. मनसेचे योगेश शेवरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, स्थायी सभापती हिमगौरी आडके, माजी महापौर अशोक मुर्तडक, संभाजी मोरु स्कर, अनिल मटाले, राहुल ढिकले, रामहरी संभेराव आदींनी शेवरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शेवरे यांच्या समर्थकांनी ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.मागील वर्षी सातपूर प्रभाग निवडणुकीत मनसेने भाजपाला पाठिंबा दिला होता. ठरल्याप्रमाणे या निवडणुकीत भाजपाने मनसेला पाठिंबा दिला आहे. पुढील तीन वर्षेदेखील मनसे आणि भाजपा एकत्र राहणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते दिनकर पाटील यांनी दिली, तर कटुता टाळण्यासाठी सातपूर प्रभाग निवडणुकीत शिवसेनेने मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणूनच शिवसेनेचे उमेदवार संतोष गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध पार पडली.  - विलास शिंदे ,शिवसेना गटनेते

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका