शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

समाधानकारक पावसाने शेतीकामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:14 IST

देवगाव : जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याच्या ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यात मजूरटंचाई : घरच्या उपलब्ध मनुष्यबळावर काम सुरू

देवगाव : जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर पावसाने बरेच दिवस दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. रोहिणींच्या सरीने बळीराजाला दिलासा मिळून त्या जोरावर शेतकऱ्यांनी भात, नागली वरईची पेरणी केली. मात्र, पुढील पावसाचे एकही नक्षत्र समाधानकारक न कोसळल्याने शेतकरी संकटात सापडला होता. मात्र, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच रिपरिप व मध्यम स्वरूपाच्या बरसणाऱ्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी समाधानी झाले आहेत.तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी आवणीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, कोरोनाच्या भीतीने व सगळ्यांनीच एकदाच शेतीकामांना सुरुवात केल्याने अनेक शेतकऱ्यांना मजूरच मिळत नसल्याने शेतीची कामे काहीशा संथ गतीने सुरू आहेत. वेळेत मजूर न मिळाल्यास भात लावणीची कामे रखडून रोपांचे नुकसान होण्याची चिंता बळीराजा करत आहे. म्हणून घरातील उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून आवणीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगावसह परिसरातील वावीहर्षे, टाकेदेवगाव, येल्याचीमेट, श्रीघाट,चंद्राचीमेट, डहाळेवाडी, टाकेहर्षे या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे आवणीच्या कामाला सुरुवात झाली असून, मजूरटंचाईमुळे शेतीच्या कामांना ब्रेक लागला आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव, वांजळे, कोरोळे या भागातून शेतकरी देवगाव परिसरातील वाडीपाड्यांमधील मजूर घेऊन जात असल्यामुळे मजुरांची उणीव भासत आहे. त्यात दरवर्षीच्या तुलनेत मजुरीवाढ केल्याने बळीराजा चिंतित आहे. मजुरांचा दरदिवसाला २५० रुपये रोज होता; परंतू, लॉकडाऊनच्या काळात मजूर मिळत नसल्याने ३०० रुपये मजुरांची मजुरी झाली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी मजुरीवाढीने हवालदिल झाला असून घरच्या उपलब्ध मनुष्यबळाच्या साहाय्याने शेतीकामांवर जोर दिला आहे.बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, आता काहीसा समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी लावणीची कामे हाती घेतल्यामुळे मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळे घरातील उपलब्ध मनुष्यबळावर लावणीचे काम हाती घेतले आहे.- खंडू देहाडे, शेतकरी, अस्वलीहर्ष 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरRainपाऊस