शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देवनदी प्रवाहित झाल्याने समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:18 IST

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधारेने उंबरदरी व कोनांबे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. देवनदी प्रवाहित झालेल्या नदीचे पाणी छोटे-मोठे बंधारे भरत पूर्व भागातील खोपडीपर्यंत पोहचले आहे. तालुक्याच्या ठाणगाव पट्ट्यातदेखील चांगला पाऊस सुरू असून, म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरण ७० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे शेतीसह पाणीपुरवठा योजनांना जीवदान मिळाले आहे.

ठळक मुद्दे जुलै महिन्यातच नदी वाहती झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधारेने उंबरदरी व कोनांबे धरण पूर्णक्षमतेने भरले आहे. देवनदी प्रवाहित झालेल्या नदीचे पाणी छोटे-मोठे बंधारे भरत पूर्व भागातील खोपडीपर्यंत पोहचले आहे. तालुक्याच्या ठाणगाव पट्ट्यातदेखील चांगला पाऊस सुरू असून, म्हाळुंगी नदीला पाणी वाहत असल्याने भोजापूर धरण ७० टक्क्यांहून अधिक भरले आहे. त्यामुळे शेतीसह पाणीपुरवठा योजनांना जीवदान मिळाले आहे.चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने देवनदीचे पाणी खोपडीपर्यंत पोहचले आहे. नदीवरील ब्रिटिशकालीन पाटांच्या माध्यमातून परिसरात हे पाणी फिरत असल्याने पूर्व भागातील शेतकरी सुखावला आहे. गतवर्षी या नदीचे पाणी वाहिले नसल्याने पूर्व भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली होती. यंदा मात्र जुलै महिन्यातच नदी वाहती झाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.पश्चिम पट्ट्यातील उंबरदरी, कोनांबे, बोरखिंड ही धरणे भरली असली तरी भोजापूर, सरदवाडी ही धरणे भरणे आवश्यक आहे. ठाणगाव आणि पट्टाकिल्ला परिसरातदेखील जोरदार पाऊस सुरू असून, या भागात उगम पावणारी म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहत आहे. म्हाळुंगीच्या पाण्यामुळे भोजापूर धरणाची जलपातळी झपाट्याने वाढत असून, बुधवारी धरणातील साठा ७० टक्क्यांपर्यंत गेला होता. देवनदीमुळे परिसरातील विहिरींनाही पाणी उतरले असून, पिण्याच्या व जनावरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे. आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नसला तरी या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतीसाठी समाधानकारक वातावरण निर्माण झाले आहे. सिन्नर शहराजवळ असलेले सरदवाडी धरण अर्धे भरले असून या धरणामुळे परिसरातील जामगाव, पास्ते, सरदवाडी परिसरातील शेतीला जीवदान मिळाले आहे.