नाशिक : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ मनोरंजनात्मक नाही, तर उपेक्षित घटकांची व्यथा समाजासमोर मांडणारे वास्तववादी विचारांचा ठेवा असल्याचे प्रतिपादन अण्णा भाऊ सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय गालफाडे यांनी केले. अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, चर्मोद्योग महामंडळ आदि मागासवर्गीय महामंडळांच्या योजना दलित समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयातील सभागृहात आयोजित प्रबोधन मेळाव्यात ते बोलत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, विजय चौधरी, प्रा. सुहास फरांदे, नंदकुमार देसाई, सुरेश पाटील, नाना शिलेदार, माधुरी जाधव, प्रकाश दीक्षित, संभाजी मोरुस्कर, कुणाल वाघ आदि उपस्थित होते. गालफाडे म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ कादंबरीच्या माध्यमातून समाजातील वास्तवाचे चित्रण केल्याचे सांगितले. सूत्रसंचालन साहेबराव पवार यांनी केले, तर शशांक हिरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
साठे यांचे साहित्य वास्तववादी
By admin | Updated: August 2, 2016 01:49 IST