शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सटाणा शहरात अचानक नगराध्यक्षांकडून स्वच्छतेची पाहणी : कर्मचाऱ्यांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 12:35 AM

सटाणा : शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दैनंदिन स्वच्छता व आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले आहे. सोमवारी (दि.6) नगराध्यक्षांनी पहाटे पाच वाजताच शहरात अचानक फेरफटका मारून स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर देव मामलेदार यात्रोत्सव मैदानात जाऊन व्यावसायिकांशी संवाद साधून नगराध्यक्षांनी स्वच्छतेबाबतचा आढावा घेतला.

ठळक मुद्देयात्रोत्सवाबाबत त्यांच्या भावना समजून घेतल्या.

सटाणा : शहरात विविध विकासकामे सुरू असतानाच नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दैनंदिन स्वच्छता व आरोग्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले आहे. सोमवारी (दि.6) नगराध्यक्षांनी पहाटे पाच वाजताच शहरात अचानक फेरफटका मारून स्वच्छता कर्मचार्यांच्या कामकाजाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर देव मामलेदार यात्रोत्सव मैदानात जाऊन व्यावसायिकांशी संवाद साधून नगराध्यक्षांनी स्वच्छतेबाबतचा आढावा घेतला. या अचानक दिलेल्या भेटीमुळे कर्मचार्यांची तारांबळ उडाली होती. सटाणा नगर परिषदेकडून सध्या शहरात विविध विकासकामे सुरू आहे. 51 कोटी रु पयांची पुनद पाणीपुरवठा योजना, नानानानी पार्क, स्कायवॉक, रिंगरोड, बायोमायनिंग आदि कामे प्रगतिपथावर आहेत.दुसरीकडे नगरपरिषदेने स्वच्छता आण िआरोग्याकडेही अतिशय गांभीर्यापूर्वक लक्ष दिले आहे. त्यामुळेच शहराने राष्ट्रीय पातळीवरील ए स्टार मानाकंन प्राप्त केले आहे.सद्यस्थितीत सुरू असलेल्या कामिगरीच्या बळावर नगरपरिषदेने थ्री स्टार मानांकनासाठी दावेदारी केली आहे. त्यानुसार सर्व कामकाज सुरळीतपणे चालते की नाही? याची खातरजमा करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे व पदाधिकार्यांकडून अचानक प्रत्यक्ष स्थळावर भेट देऊन पाहणी केली जात आहे. त्यानुसार शहरात यात्रा उत्सवाची धामधुम सुरू असतानाच नगराध्यक्षांनी पदाधिकार्यांसमवेत सोमवारी (दि.6) भल्या पहाटे पाच वाजताच शहरातून फेरफटका मारून पाहणी केली.सर्वप्रथम नगराध्यक्षांनी स्वच्छता मुकादम किशोर सोनवणे, बजरंग काळे, खलील पटेल यांच्याकडून कामकाजाचे नियोजन समजून घेतले. त्यानुसार प्रत्यक्ष ठिकठिकाणी जाऊन संबंधित कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतात का? याची नगराध्यक्षांनी खातरजमा केली.शहरातील पाहणी करतांनाच नगराध्यक्षांनी अचानक आपला मोर्चा यात्रा मैदानाकडे वळविला. याठिकाणी दैनंदिन स्वच्छतेबाबत थेट व्यावसायिकांकडूनच विचारपूस केली.यावेळी नगराध्यक्षांनी बाहेरगावाहून आलेल्या व्यावसायकांसोबत शेकोटीचा आनंद घेत यात्रोत्सवाबाबत त्यांच्या भावना समजून घेतल्या.यानंतर नगराध्यक्षांनी नगरपरिषद कार्यालयात जाऊन हजेरी पत्रक तपासले. वाहनतळावर जाऊन वाहनचालकांकडून कामकाज व वाहनांच्या अडी अडचणींबाबत विचारपूस केली. अगदी भल्या पहाटे नगराध्यक्षांचा दौरा पाहून अनायसेच कर्मचारी आवाक झाले आण ित्यांची चांगलीच तारांबळही उडाल्याचे दिसून आले.परंतु यावेळी नगराध्यक्षांनी कर्मचाऱ्यांसमवेत आस्थेने संवाद साधताना आवश्यक सूचनाही केल्या. या अचानक भेटी देताना नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या समवेत आरोग्य सभापती दिनकर सोनवणे, नगरसेवक दीपक पाकळे, सामाजिक कार्यकर्ते नाना मोरकर, अ‍ॅड. दीपक सोनवणे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाnagaradhyakshaनगराध्यक्ष