शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अर्भक मृत्यू प्रकरणी वैद्यकीय विभागाची सारवासारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:39 IST

पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचावाची भूमिका घेतली जात आहे. मात्र, महापौरांनी आयुक्तांची भेट घेत या साºया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.

नाशिक : पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच नवजात अर्भक दगावल्याचा आरोप करत मृत अर्भक थेट महापालिका मुख्यालयात घेऊन येण्याची घटना मंगळवारी घडल्यानंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारवासारव चालविली असून, बचावाची भूमिका घेतली जात आहे. मात्र, महापौरांनी आयुक्तांची भेट घेत या साºया प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून चौकशीचा अहवाल मागविला आहे.  इंदिरा गांधी रुग्णालयात आशा तांदळे या गर्भवती महिलेला प्रसूतीकळा येत असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष केल्याने नवजात अर्भक दगावल्याचा आरोप तिच्या पतीसह आईने केला होता. याशिवाय, सदर महिलेच्या आईने मृत अर्भक घेऊन महापालिका मुख्यालय गाठले होते आणि अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावरच मृत अर्भक ठेवत कारवाईची मागणी केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, डॉ. भंडारी यांनी बुधवारी (दि.२०) पत्रकारांशी बोलताना या साºया प्रकरणाबाबत बचावाची भूमिका घेतली आणि अतिशयोक्तीपूर्ण विधाने करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेता दिनकर पाटील, भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन या गंभीर प्रकरणाबद्दल सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी सांगितले, या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून, अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधीक्षकांकडून सविस्तर चौकशी अहवाल मागविण्यात आला आहे. मग बिल का घेतले? महापालिकेने शताब्दी हॉस्पिटलमध्येच बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्याचबरोबर, राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ मिळावा म्हणून शताब्दी हॉस्पिटलची शिफारस करण्यात आली असेल तर शताब्दी हॉस्पिटलचे बाळाच्या उपचाराचे १२ हजाराचे बिल कशासाठी घेतले, असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. जीवनदायी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधिताने हॉस्पिटलमध्ये नोंदणी करणे आवश्यक असते. परंतु, अशी नोंदणी हॉस्पिटलने का करून घेतली नाही, असाही सवाल उपस्थित होतो.

टॅग्स :Nashikनाशिकdocterडॉक्टर